362 coronary free, while 317 new patients | नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्ण अधिक

नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्ण अधिक

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवार दि. २४ रोजी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. दिवसभरात  ३६२ रुग्णांना सुटी देण्यात आली, तर कोरोनाच्या ३१७ नव्या रुग्णांची भर पडली. तसेच उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या आता ३२,०८९ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २५,०५४ रूग्ण बरे  झाले आहेत.  तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६,१४२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात  मनपा हद्दीतील  २१६ आणि ग्रामीण भागातील १४६ अशा एकूण ३६२ रूग्ण उपचार घेऊन गुरुवारी घरी परतले.  जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ३१७ रुग्णांत ग्रामीण भागातील १२५, मनपा हद्दीतील ९७ आणि अन्य ९५ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना खुलताबाद येथील ५५ वर्षीय स्त्री, नवयुग  कॉलनीतील ७८ वर्षीय पुरूष आणि पैठणमधील ६३ वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

 

Web Title: 362 coronary free, while 317 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.