358 more corona patients in Aurangabad on Tuesday | मंगळवारी औरंगाबादेत ३५८ कोरोना रुग्णांची वाढ

मंगळवारी औरंगाबादेत ३५८ कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या ३५८ नव्या रुग्णांची वाढ झाली. तर उपचार सुरू असताना इतर जिल्ह्यातील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ३५८ रुग्णांत ग्रामीण भागातील १३५, मनपा हद्दीतील ८८, सिटी एंट्री पॉइंटवरील ६३ आणि अन्य ७२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या ३१,४४३ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २४,५०६ रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ८८६ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ६,०५१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात मनपा हद्दीतील १२१ आणि ग्रामीण भागातील ९९ रुग्णांना सुटी देण्यात आली.

 

उपचार सुरू असताना एकोड पाचोड येथील ६२ वर्षीय स्त्री, गंगापूर तालुक्यातील कोलघर येथील ६० वर्षीय पुरूष, शहरातील नवजीवन कॉलनीतील ७५ वर्षीय पुरुष, बीड बायपास रोडवरील दिशानगरीतील ९१ वर्षीय स्त्री, कटकट गेट येथील ५६ वर्षीय स्त्री, एअरपोर्ट कॉलनीतील ५० वर्षीय पुरूष, वाळूज पोलिस स्टेशन जवळील ७६ वर्षीय पुरुष आणि पोलीस कॉलनी , जालना येथील ५५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

 

Web Title: 358 more corona patients in Aurangabad on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.