106 kg cannabis seized in Aurangabad | औरंगाबादमध्ये पकडला १०६ किलो गांजा

औरंगाबादमध्ये पकडला १०६ किलो गांजा

औरंगाबाद : मॅफेड्रोन, चरस तस्करांवर अवघ्या दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता  तब्बल १०६ किलो गांजा  शहर गुन्हे  शाखेने  पाठलाग करून जप्त केला आहे. गुरूवारी पहाटे ३ वाजता हर्सुल परिसरातील मयुरपार्क रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

इनोव्हा कारमधून हा गांजा शहरात आणला गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कारमधून शहरात गांजा आणला जाणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड आणि दोन पथकाने हर्सुल नाका आणि केंब्रिज शाळा रस्त्यावर सापळा लावला होता. पहाटे ३ वाजता संशयित कार केंब्रिज चौकाकडुन बायपासमार्गे हर्सुलकडे जाऊ लागली असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि समोरच्या पथकाला कारची माहिती कळविली. त्यानुसार मयूरपार्क येथे सज्ज असणाऱ्या दुसऱ्या पथकाने कार पकडली आणि १०६ किलो गांजा ताब्यात घेतला.

Web Title: 106 kg cannabis seized in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.