Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २९ मे २०२२ ते ०४ जून २०२२: ‘या’ ७ राशींना नोकरीत शुभ वार्ता मिळतील; आर्थिक लाभाचा सप्ताह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 07:19 IST2022-05-29T07:14:09+5:302022-05-29T07:19:46+5:30

Weekly Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आगामी आठवडा..., काय सांगते तुमची राशी...

weekly horoscope 29 may 2022 to 04 june 2022 know what your rashi says rashi bhavishya | Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २९ मे २०२२ ते ०४ जून २०२२: ‘या’ ७ राशींना नोकरीत शुभ वार्ता मिळतील; आर्थिक लाभाचा सप्ताह

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २९ मे २०२२ ते ०४ जून २०२२: ‘या’ ७ राशींना नोकरीत शुभ वार्ता मिळतील; आर्थिक लाभाचा सप्ताह

मेष: हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपली मनःस्थिती खूप चांगली राहिल्याने इतरांना खुश करण्याची आपणास इच्छा होईल. लोक आपल्याकडे आकर्षित होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असल्याने आपण आपल्या कामाचा आनंद घेऊ शकाल. ह्या आठवड्यात व्यापारी नवीन सिद्धी प्राप्त करू शकतील. त्यांना चांगल्या बातम्या ऐकावयास मिळतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन उत्तम असेल. आपल्या संबंधात रोमांस भरलेला असेल. आपण आपल्या जोडीदाराकडे काहीही मागू शकाल, व आपली मागणी पूर्ण झाल्यावर त्याचा आनंद सुद्धा आपण घेऊ शकाल. अधिक वाचा

वृषभ: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपली प्राप्ती व हिंमत दोन्हीही वाढतील. त्यामुळे आपण आव्हानांना सामोरे जाऊन पुढे जाल, जी एका यशस्वी व्यक्तीची ओळख आहे. आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊन आपली सर्व कामे प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने पूर्ण करू शकतील. असे केल्याने आपली कामे वेळेपूर्वी व उत्तम प्रकारे पूर्ण होतील. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात खूप मोठा नफा होईल. आपल्या योजना यशस्वी होतील. आर्थिक गुंतवणुकीमुळे फायदा होऊन व्यापारातील नफा वाढेल. अधिक वाचा

मिथुन: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून आपल्या प्राप्तीत खूप मोठी वाढ होऊ लागेल. थोडेफार खर्च होतील, परंतु प्राप्ती इतकी चांगली असेल कि आपणास खर्चाची काळजी करावी लागणार नाही. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. आपली पदोन्नती सुद्धा संभवते. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास दूरवरच्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे आपण खूपच आनंदित व्हाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपणास कामात मदत करेल. अधिक वाचा

कर्क: हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपले व्यक्तिगत जीवन व कार्य ह्यात समतोल साधण्याचा प्रयत्न कराल, व त्यात आपण बऱ्याच प्रमाणात यशस्वी सुद्धा व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. ते आपले काम सहजपणे पूर्ण करू शकतील. त्यामुळे त्यांचा भरपूर वेळ वाचू शकेल. हा वाचलेला वेळ ते आपल्या कुटुंबियांना देऊ शकतील. नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी आपणास मिळाल्याने आपली हिंमत वाढेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपल्या व्यापारात प्रगती होऊन आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. अधिक वाचा

सिंह: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या कामाचा आनंद घेऊ शकाल. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी आपली प्रतिमा उंचावेल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अपेक्षेपेक्षा जास्त चांगला आहे. आपल्या व्यापारात वाढ होऊन आपण हळूहळू नक्कीच प्रगती करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. परंतु काही व्यक्ती आपल्या अभ्यासात अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यांच्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. अधिक वाचा

कन्या: हा आठवडा सुरवातीलाच आपल्यासाठी चांगली बातमी घेऊन येणार आहे. आपणास दूरवरच्या ठिकाणांहून चांगली बातमी मिळण्याची संभावना आहे. आपल्या व्यापारास गती येईल. आपली प्राप्ती व नफा हे दोन्ही वाढतील. त्यामुळे आपण खूपच आनंदित व्हाल. आपले मनोबल सुद्धा उंचावेल. नोकरी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. आपल्या पगारवाढी संबंधी चर्चा होऊ शकते. आपल्याकडून काही चूक होऊ देऊ नका. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. अधिक वाचा

तूळ: हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस एखादे मोठे काम हाती घेतल्यास त्यात नुकसान होण्याची संभावना असल्याने ते घेऊ नये. तसेच ह्या आठवड्यात आर्थिक गुंतवणूक करणे हितावह नसल्याने ती सुद्धा टाळावी. कामाच्या बाबतीत हा आठवडा सामान्यच आहे. व्यापाऱ्यांना फायदा झाला तरी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना संघर्ष करावा लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत. अधिक वाचा

वृश्चिक: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीसच आपल्या व्यवसायास तेजी असल्याचे दिसून येईल. आपण उत्साहित होऊन कार्य पूर्णत्वा पर्यंत घेऊन जाल व त्यामुळे आपणास आनंददायी परिणाम मिळतील. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. आपला नफा सुद्धा वाढेल. लोकांशी आपले संबंध सुधारल्याने कामात चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपल्या कामाची प्रशंसा होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. अधिक वाचा

धनु:  हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. ह्या आठवड्यात कोणतेही मोठे काम हाती घेऊ नये, तसेच स्वतः विनाकारण काळजी करत बसू नये. असे न केल्यास मानसिक चिंता वाढून आपण आजारी पडण्याची शक्यता आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव वाढतील. ते टाळण्यासाठी आपण शांत राहावे. ह्या आठवड्यात आपणास गुंतवणूक करावयाची असल्यास आपण ती करू शकाल. तसेच आपले पैसे कोणाकडे अडकले असतील तर आपण त्यांच्याकडे त्याची मागणी करू शकाल. आपण त्यात यशस्वी व्हाल. अधिक वाचा

मकर: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगले परिणाम घेऊन येणारा आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास खूप मोठा लाभ मिळाल्याने प्रोत्साहन मिळेल व आपल्याला अधिक काम करावेसे वाटेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी सामान्य आहे. परंतु आपणास आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आपल्या हातून चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रकृती चांगली राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात एखाद्याची चांगली मदत मिळेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. अधिक वाचा

कुंभ: हा आठवडा आपल्यासाठी आनंददायी बातमी घेऊन येणारा आहे. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आपणास जे काही करण्याची इच्छा होईल ते करण्यात आपण यशस्वी व्हाल. आपण मित्रांच्या सहवासात वेळ सुद्धा घालवाल. प्रवास करण्यात अधिक वेळ वाया जाण्याची संभावना आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील. आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात दृढपणे प्रगती साधू शकतील. अधिक वाचा

मीन: हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबात एखादे शुभ कार्य होण्याची संभावना आहे. परंतु, एखाद्या व्यक्तीमुळे रंगाचा बेरंग होण्याची संभावना आहे, तेव्हा सावध राहावे. प्राप्तीत वाढ तर खर्चात कपात होईल. त्यामुळे आपण आनंदित व्हाल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती चिकाटीने कामे करू शकतील. आपणास वरिष्ठांचा पाठिंबा सुद्धा मिळेल. व्यापारी आपल्या कार्यात आक्रमक होतील.  हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपल्या मेहनतीमुळे आपणास चांगला परिणाम मिळेल. अधिक वाचा

Web Title: weekly horoscope 29 may 2022 to 04 june 2022 know what your rashi says rashi bhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app