शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे कामकाज सुरू

By admin | Updated: March 28, 2017 00:08 IST

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सोमवार २७ मार्च रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

पाणी, शिक्षण आरोग्याला प्राधान्य : विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवादअमरावती : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सोमवार २७ मार्च रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक २१ मार्च रोजी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे नितीन गोंडाणे यांची अध्यक्षपदावर, तर सेनेचे दत्ता ढोमणे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. यानंतर जिल्हा परिषदेचे ३० वे अध्यक्ष म्हणून नितीन गोंडाणे यांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली. यावेळी काँग्रेसचे नेते तथा आमदार वीरेंद्र जगताप, आमदार यशोमती ठाकूर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब भागवत, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, जयंत देशमुख, अभिजित बोके, वासंती मंगरोळे, अलका देशमुख, अनिता मेश्राम, वैशाली बोरकर, रंजना गवई, नितीन दगडकर, सुरेश निमकर, वंदना करूले, गजानन राठोड, माजी सदस्य मोहन सिंगवी, गणेश आरेकर, बंडू देशमुख, सीईओ किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे, डेप्युटी सीईओ कैलास घोडके तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान अध्यक्ष गोंडाणे यांनी पदभार स्वीकारताच प्रशासकीय कामांची चुणूक दाखविली. यावेळी प्रशासकीय कामांची ओझरती माहिती घेऊन उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यावर आपला भर राहील, असे अध्यक्ष गोंडाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यात शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता यासह पारदर्शक कारभार आणि गतिमान प्रशासन याला आपली प्राथमिकता राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कर्मचारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध संघटनंच्या पदाधिकाऱ्यांनीही अध्यक्षांचे स्वागत केले. दरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे हे गुरुवारी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील. (प्रतिनिधी)