शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापन समिती ठरवणार जिल्हा परिषद शाळांचे 'ड्रेसकोड'

By admin | Updated: May 16, 2015 00:37 IST

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा गणवेश एकसारखा असण्याचा अधिकारी आणि पुढाऱ्यांच्या हट्टामागे अर्थकारणाचा ..

अंमलबजावणी : सारख्या गणवेशाची सक्ती उठविलीअमरावती : जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा गणवेश एकसारखा असण्याचा अधिकारी आणि पुढाऱ्यांच्या हट्टामागे अर्थकारणाचा वास येत असल्याने आता समसमान शालेय गणवेशाची सक्ती शिक्षण विभागाने उठविली आहे. ग्रामपंचायतीवरील शाळा व्यवस्थापन समितीस ड्रेस कोड ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे नियमीत गणवेशास नापसंती दर्शविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना आता पसंतीचे गणवेश खरेदी करता येणार आहेत.जिल्हा परिषदेच्या १६०२ प्राथमिक शाळांमध्ये दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट, मुलींसाठी पांढऱ्या रंगाचे ब्लाऊज आणि निळ्या रंगाचे स्कर्ट हा ड्रेसकोड वापरला जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील गणवेश बदलण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे शिक्षक संघटनानी शिक्षण संचालनालयाला कळविले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने २२ एप्रील २०१५ रोजी गणवेश बदल्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुलांचा गणवेश कसा असावा याचा निर्णय घेण्याचा सर्वाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीत दिले आहेत. त्यानुसार ही समिती बैठक घेऊन ड्रेस कोड निश्चित करेल. त्यामुळे गैरप्रकार बंद होण्यास मदत होईल.तसेच मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायद्यान्वये मुलांना शासनाच्या मदतीने दरवर्षी मोफत गणवेशाचे वाटप केले जाते मात्र गणवेशाची सक्ती कायम होती. प्रतिवर्षी एका विद्यार्थ्यास दोन गणवेशासाठी चारशे रुपये अनुदान मिळते. यामधून शाळा व्यवस्थापन समित्यांना पसंतीचा गणवेश खरेदी करता येणार आहे. (प्रतिनिधी)आदेश धडकलेजिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना खरेदी करावयाचा गणवेश अमूक एका व्यक्तीकडून किंवा दुकानादाराकडून खरेदी करावा किंवा एकत्रित कपडा खरेदी करावा यासाठी कुणासही प्रोत्साहित करु नये. क्षेत्रीय कार्यालयांनी याची काळजी घ्यावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने यांनी काढले आहे.