बडनेरा बसस्थानकासमोर तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 18:26 IST2022-07-26T18:25:08+5:302022-07-26T18:26:01+5:30

घटनेच्या पूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता.

Youth killed in front of Badnera bus stand, accused arrested | बडनेरा बसस्थानकासमोर तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, आरोपी अटकेत

बडनेरा बसस्थानकासमोर तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, आरोपी अटकेत

बडनेरा (अमरावती) : येथील नवीवस्तीच्या बसस्थानकासमोर महामार्गावर एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश सागर मेश्राम (३२, रा. मिलचाळ, नवीवस्ती, बडनेरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनुसार, अविनाश उर्फ दादू रणदिवे (२७), राजत राजू रामटेके (२५, दोघेही राहणार मिलचाळ) अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत. या दोघांविरूद्ध खुनाचा गुन्हा नोदविला आहे. मृतक व आरोपींमध्ये आपसात वाद होता. या वादाचे पर्यवसान खुनात झाले. घटनेच्या पूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. मृतक अंकुश यांच्या कानाच्या मागील बाजूस व पोटात शस्त्राने मारल्याच्या खुणा आहेत.

आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले चाकू जप्त करण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मृतक व आरोपींपैकी अविनाश रणदिवे याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त एम. एम. मकानदार, सहायक आयुक्त डी. एस. ढोले, पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार पोहोचले होते. बङनेरा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Youth killed in front of Badnera bus stand, accused arrested