आईच्या अपघाताची बतावणी करून केले तरुणीचे  अपहरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 10:54 AM2021-07-21T10:54:28+5:302021-07-21T11:00:11+5:30

Amravati News आईचे अपहरण झाल्याची बतावणी करीत दाेन बहिणींपैकी एकीचे अपहरण केले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास दत्तापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

The young woman was abducted on the pretext of her mother's accident | आईच्या अपघाताची बतावणी करून केले तरुणीचे  अपहरण 

आईच्या अपघाताची बतावणी करून केले तरुणीचे  अपहरण 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : आईचे अपहरण झाल्याची बतावणी करीत दाेन बहिणींपैकी एकीचे अपहरण केले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास दत्तापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घडली..

जुन्या धामणगाव परिसरातील एका कॉलनीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीबाबत काही महिन्यांपूर्वी बलात्काराची घटना घडली होती. या घटनेच्या संबंधाने २० जुलै रोजी साक्ष नोंदविण्यासाठी तिची आई अमरावती येथे गेली होती. दरम्यान, दुपार १ वाजेच्या सुमारास दोघी बहिणी घरी असताना एक फोन आला. यावर तुझ्या आईचा अपघात झाला आहे, तू लवकरात लवकर धामणगावच्या ग्रामीण रुग्णालय येथे पोहोच, असे सांगण्यात आले. दोघी बहिणींनी शास्त्री चौक परिसरातील ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली.

दरम्यान, शास्त्री चौक, सिंधी कॅम्प परिसरात या दोघी बहिणींना तीन अनोळखी युवकांनी अडवले व मोठ्या बहिणीला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जबरदस्तीने टाकून तिथून पळून गेले. आई परत आल्यानंतर लहान बहिणीने सदरची घटना आईला सांगितली. कुटुंबाने तत्काळ दत्तापूर पोलीस स्टेशन गाठले व सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दत्तापूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

चांदूर रेल्वेचे उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी तातडीने पोलीस ठाण्यास भेट दिली. पुढील तपास दत्तापूर ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय द्वारका अंभोरे करीत आहेत.

Web Title: The young woman was abducted on the pretext of her mother's accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app