"तू 'लाडक्या बहिणी'त नाही, तुझ्यामुळे माझे नुकसान" पतीने लाडक्या बहिणीच्या पैशांसाठी केली बेल्टने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:50 IST2025-11-07T13:48:01+5:302025-11-07T13:50:01+5:30
Amravati : एफआयआरनुसार, पीडितेचा आणि आरोपी आकाशचा सुमारे दीड वर्षापूर्वी विवाह झाला आहे. लग्नानंतर तक्रारदार पत्नीने नवीन आधारकार्ड काढण्यासाठी आणि त्यावर पतीचे नाव नोंदवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु तांत्रिक अडचणींमुळे तिचे नवीन आधारकार्ड तयार झाले नाही.

"You are not in 'Ladki Bahin', that is my loss" Husband beats beloved sister with belt for money
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तुझ्या चुकीमुळे तुझे आधारकार्ड निघाले नाही. परिणामी अख्ख्या महिलांना १५०० रुपये प्रतिमहिना मिळत असताना तू मात्र त्या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. परिणामी, तुझे नव्हे तर माझे मोठे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष काढत एका मद्यपी पतीने पत्नीस बेल्टने बेदम मारहाण केली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सार्सी येथे ३ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ती घटना घडली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी आरोपी पती आकाश (२८) याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
एफआयआरनुसार, पीडितेचा आणि आरोपी आकाशचा सुमारे दीड वर्षापूर्वी विवाह झाला आहे. लग्नानंतर तक्रारदार पत्नीने नवीन आधारकार्ड काढण्यासाठी आणि त्यावर पतीचे नाव नोंदवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु तांत्रिक अडचणींमुळे तिचे नवीन आधारकार्ड तयार झाले नाही. यामुळे तिला 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभासाठी नोंदणी करता आली नाही, त्यामुळे ती दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहिली. गावातील इतर महिलांना या योजनेचा लाभ मिळत असताना, पत्नीला मदत न मिळाल्याने आरोपी पती आकाश वारंवार पत्नीवर संताप व्यक्त करत होता. तशातच ती अमरावतीहून परत आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा पत्नीशी वाद घातला. याप्रकरणी लोणी पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी आरोपी आकाशविद्ध गुन्हा दाखल केला.
काय घडले नेमके ?
फिर्यादी महिला अमरावतीला दवाखान्यात गेली होती. ३ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ती सार्सी येथे परतली असता आरोपी पती हा दारू पिऊन घरी आला. तुझ्यामुळेच तुझे आधार कार्ड निघालेले नाही. त्यामुळे तुला लाडकी बहीण योजनेचा लाभमिळत नाही.
ती १५०० रुपये प्रतिमहिना रक्कम मिळत नसल्याने माझे नुकसान होत आहे, असे तो बरळला. त्याने पत्नीला शिवीगाळ केली. मद्यधुंद अवस्थेत त्याने पत्नीला कमरेच्या बेल्टने पाठीवर डाव्या बाजूला, डाव्या पायावर व मांडीवर बेदम मारहाण केली. तथा मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद गिरडकर हे करीत आहेत.