माजी खासदार नवनीत राणा यांना सामूहिक बलात्काराची धमकी, पत्र पाठवणारा कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:54 IST2025-10-30T17:31:34+5:302025-10-30T17:54:24+5:30

Amravati : नवनीत राणा यांच्या कार्यालयात हे पत्र स्पीड-पोस्टने आले. पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली होती.

"You are Modi's wife, in front of your children.." 'Speed Post' threatens former MP Navneet Rana again | माजी खासदार नवनीत राणा यांना सामूहिक बलात्काराची धमकी, पत्र पाठवणारा कोण?

Former MP Navneet Rana receives gang rape threat ! who sent the letter?

अमरावती : भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना स्पीड-पोस्टद्वारे मृत्यू आणि गँगरेपची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की धमकीचे हे पत्र हैदराबाद येथून पाठवण्यात आले असून पाठवणाऱ्याचे नाव "जावेद" असल्याचा उल्लेख पत्रात आहे. पोलिसांनी पत्राचा स्रोत आणि त्यामागील हेतू शोधण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. नवनीत राणा यांचे पीए मंगेश कोकाटे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 

नवनीत राणा यांच्या कार्यालयात हे पत्र स्पीड-पोस्टने आले. पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी हे पत्र ताब्यात घेतले आहे. पाठवलेल्या पत्रात आरोपीनं नवनीत राणांना "तुमच्या मुलासमोरच तुमच्यावर बलात्कार करू, तू पंतप्रधान नरेंद्र मोदींची बायको आहेस" असंही या पत्रात म्हटलं आहे.

पूर्वीही मिळाल्या धमक्या

नवनीत राणा यांना यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. याआधी, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांना अशाच प्रकारचे पत्र मिळाले होते, ज्यात गँगरेप, हत्येच्या धमक्या आणि दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्या वेळीही पोलिसांनी तपास सुरू केला होता.

पोलिसांचा तपास सुरू

अमरावती पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून सायबर आणि क्राईम ब्रांचच्या टीमना तपासासाठी जोडले आहे. तसेच हैदराबाद पोलिसांशी समन्वय साधून पत्र पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे.

नवनीत राणा यांची पार्श्वभूमी

नवनीत राणा या माजी अभिनेत्री असून त्यांनी हिंदी, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांत काम केले आहे. त्या २०१९ साली अमरावती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्या होत्या. सध्या त्या भारतीय जनता पक्षाशी संलग्न आहेत.

या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनी त्यांच्याभोवती सुरक्षा वाढवली असून तपासाच्या निकालानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

Web Title : नवनीत राणा को स्पीड पोस्ट से मिली बलात्कार, जान से मारने की धमकी

Web Summary : पूर्व सांसद नवनीत राणा को स्पीड पोस्ट से बलात्कार और जान से मारने की धमकी मिली, पुलिस जांच शुरू। हैदराबाद से भेजा गया पत्र, हिंसा की धमकी। पहले भी ऐसी धमकियां मिल चुकी हैं।

Web Title : Navneet Rana receives death, rape threat via speed post again.

Web Summary : Ex-MP Navneet Rana received death and rape threats via speed post, sparking police investigation. Letter, sent from Hyderabad, threatens violence. Similar threats occurred previously.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.