शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करावी

By admin | Updated: September 22, 2015 00:24 IST

भयगंड सोडून स्त्रीने तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे, असा सल्ला महिला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका अश्विनी पारळकर यांनी दिला.

अश्विनी पारळकर : प्रशिक्षितांना प्रमाणपत्र अमरावती : भयगंड सोडून स्त्रीने तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे, असा सल्ला महिला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका अश्विनी पारळकर यांनी दिला. रायसोनी ग्रुप व लोकमत सखीमंचच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या संगणक प्रशिक्षण उपक्रमांतर्गत संगणकाचे पायाभूत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.व्यासपीठावर रायसोनी ग्रुपचे उपाध्यक्ष हेमंत सोनारे व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य पी.व्ही. इंगोले उपस्थित होते. प्रास्ताविकातून उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना हेमंत सोनारे यांनी चार भिंतीच्या आत राहून संगणकाकडे तिऱ्हाईतपणे पाहणऱ्या महिलांना संगणक हाताळता यावे. एवढेच नव्हे, तर हल्ली नित्याचे झालेले आॅनलाईन व्यवहार त्यांना घरबसल्या करता यावेत, या हेतूने रायसोनी ग्रुपने महिलांना नि:शुल्करीत्या संगणक साक्षर करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. पी.व्ही. इंगोले यांनी पायाभूत संगणक साक्षर अभ्यासक्रमाच्या पलीकडेही महिलांना संगणकासंदर्भात काही मार्गदर्शनाची गरज भासल्यास रायसोनी महाविद्यालयाकडून दिले जाईल, अशी ग्वाही उपस्थित महिलांना दिली. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी काही प्रशिक्षित महिलांनी आपले अनुभव व्यक्त केले. संचालन व आभार प्रदर्शन संगणक प्रशिक्षिक पूजा मायंदे यांनी केले.कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष मयुरा देशमुख, नगरसेविका सुषमा बर्वे, रामदास पारळकर, सागर देशमुख यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला व रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)