प्रेयसी तीन महिन्यांची गर्भार; ‘लिव्ह इन पार्टनर’ रफुचक्कर!

By प्रदीप भाकरे | Updated: May 25, 2023 17:34 IST2023-05-25T17:32:03+5:302023-05-25T17:34:53+5:30

विवाहितेने घेतली ठाण्यात धाव : आरोपी पळाला युपीला

woman is three months pregnant, 'Live in partner ran away | प्रेयसी तीन महिन्यांची गर्भार; ‘लिव्ह इन पार्टनर’ रफुचक्कर!

प्रेयसी तीन महिन्यांची गर्भार; ‘लिव्ह इन पार्टनर’ रफुचक्कर!

अमरावती : ‘लिव्ह इन’मध्ये राहत असताना पार्टनरने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने महिला पार्टनर तीन महिन्यांची गर्भवती झाली. त्याबाबतच सांगताच लिव्ह इन पार्टनरने तिला वाऱ्यावर सोडत अमरावतीतून पळ काढला. २४ मे रोजी रात्री हा प्रकार उघड झाला. राजापेठ पोलिसांनी २३ वर्षीय पिडिताच्या तक्रारीवरून आरोपी आदित्यसिंग ठाकूर (२१, रा. बरकतपूर, जि. प्रयागराज, उत्तरप्रदेश) याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

तो आपल्याला एकाकी सोडून मुळगावी गेला असावा, या शक्यतेने पिडिताने त्याच्या वडिलांना फोनवरून संपर्क साधला. मात्र आदित्यसिंग हा गावी परतला नाही, त्याच्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे उत्तर मिळाल्याचे पिडिताने म्हटले आहे. ११ मे २०२२ पासून आरोपीने लिव्ह इन मध्ये राहत वारंवार आपले लैंगिक शोषण केले. मात्र गर्भारपणाचे सांगताच त्याओ आपल्याला शिविगाळ व मारहाण केली. तथा १५ दिवसांआधी कुणाला काहीही न सांगता तो निघून गेल्याचे पिडिताचे म्हणणे आहे.

ती दोन मुलांची आई

पिडिताचे काही वर्षांपुर्वी पहिले लग्न झाले. पहिल्या पतीपासून तिला दोन मुले आहेत. मात्र, पती दारूच्या आहारी गेल्याने व तो मारहाण करत होता. दोघांमध्ये नेहमीच वाद झडायचे. अशातच पहिला पती तिला सोडून दुसरीकडे राहायला गेला. दरम्यानच्या काळात तिच्या पहिल्या पतीने त्याचा नातेवाईक असलेल्या आदित्यसिंग ठाकूर याला कामानिमित्त अमरावतीला आणले. काही दिवसांनी पिडिता व त्याची ओळख झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला.

तिलाही वाटले तो आधार बनेल!

भाभी खुप त्रासात आहे, मी तुला आनंदात ठेवेन, जीवनभर साथ देईल, असे तो बरळला. त्यामुळे तिला देखील धीर आला. आदित्यसिंह आपल्याला आधार देईन, असा विचार करून तिनेही त्याच्या बेगडी प्रेमाला होकार भरला. प्रेम व लग्नाची बतावणी करून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध केले. त्यानंतर लग्न न करताही तो वारंवार शोषण करीत राहिला. अखेर त्याने पळ काढल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. आपण भाड्याच्या खोलीत राहतो. दोन मुुलांचा सांभाळ, भाडे व अन्य खर्चाला देखील पैसे नसल्याने आरोपीला अमरावतीला बोलावण्याची आर्जव तिने राजापेठ पोलिसांकडे केली.

Web Title: woman is three months pregnant, 'Live in partner ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.