शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जमीनच देणार नाही, मोजणी कशाची ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 00:39 IST

नागपूर-मुंबई शिघ्रसंचार समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. कसदार जमीन द्यावयास शेतकरी

वीरेंद्र जगतापांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले : समृद्धी प्रकल्पाचा मुद्दा तापला अमरावती : नागपूर-मुंबई शिघ्रसंचार समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. कसदार जमीन द्यावयास शेतकरी तयार नाहीत. जमीनच देणार नाही, तर मोजणी कशाची, असा संतप्त सवाल आमदार वीरेंद्र जगताप यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्याबाबत आधी मोजणी होऊ द्या, नंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काय तो निर्णय घेऊ, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर जाम भडकलेल्या आमदार वीरेंद्र जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना हा सवाल केला. येथील नियोजन भवनात वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आ. जगताप यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. प्रस्तावित समृद्धी महामार्गाकरिता अमरावती जिल्ह्यातील ९० व वाशिम जिल्ह्यातील ११० कि. मी. लांबीची जमीन प्रकल्पात अधिग्रहित करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ही सर्व जमीन सुपीक व बागायती आहे. यापूर्वी समांतर महामार्गासाठी याच परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने अधिग्रहीत केलेल्या आहेत. - सीएम म्हणाले, तुम्हीच व्हा मुख्यमंत्री ! नागपूर-मुंबई या शिघ्रगती महामार्गाला किमान ५० हजार शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकरी त्यांची कसदार व बागायती जमीन द्यावयास तयार नाही, असे आ. जगतापांनी मुख्यमंत्र्यांना सांगताच जर एवढ्या प्रमाणात विरोध आहे तर मी राजीनामा देतो, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, अशा शब्दांत सीएमने भावना व्यक्त केल्या. समृद्धी प्रकल्पाच्या मुद्यावर आ. जगतापांचा मुख्यमंत्र्यांशी ‘हॉट टॉक’ झाला, तो क्षण.