अवघ्या पाच हजारांसाठी पत्नीचा अश्लील फोटो व्हायरल, पतीचा कारनामा; तलाक देण्याचीही धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 21:15 IST2022-10-09T21:14:58+5:302022-10-09T21:15:41+5:30

तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पती पत्नी आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झडत असल्याने ती महिला माहेरी निघून गेली होती.

Wife's obscene photo viral for just five thousand Threat of divorce | अवघ्या पाच हजारांसाठी पत्नीचा अश्लील फोटो व्हायरल, पतीचा कारनामा; तलाक देण्याचीही धमकी

सांकेतिक छायाचित्र

अमरावती : अवघ्या पाच हजारांसाठी चक्क पत्नीचा स्वत: सोबतचा अश्लील फोटो व्हायरल करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अलहिलाल कॉलनी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय पतीविरुद्ध विनयभंग, खंडणी, धमकी व आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली.

तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पती पत्नी आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झडत असल्याने ती महिला माहेरी निघून गेली होती. दरम्यान ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास तो सासरी पोहोचला. तिला शिवीगाळ केली. तथा पाच हजार रुपयांची मागणी केली. ती रक्कम न दिल्यास तलाक देईल. तथा आपल्या सोबतचा अश्लील फोटो व्हायरल करेल,अशी धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेला.

भावाला पाठविला तो फोटो -
पत्नीला धमकावत तो निघून गेला. अन् त्याने स्वत:सोबतचा पत्नीचा अश्लील फोटो पत्नीसह तिच्या भावाच्या मोबाइलवर पाठवून तो व्हॉट्सॲपवर व्हायरल केला. ते समजताच तिने नागपुरी गेट पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांनी तिची तक्रार नोंदवून घेतली.
 

Web Title: Wife's obscene photo viral for just five thousand Threat of divorce