शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील परीक्षांची कामे खासगी संस्थांना का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

राज्य विधानमंडळ सचिवालयाने २८ जानेवारी रोजीच्या पत्रानुसार उच्च व तंत्रशिक्षण उपसचिवांना विधानसभेत तारांकित प्रश्न क्रमांक १८४ अन्वये विद्यापीठात परीक्षा संबंधित आणि विविध कामे खासगी संस्थांना देण्यात आल्याविषयी अहवाल मागविला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानेसुद्धा परीक्षेशी निगडित कामे आणि नेमलेल्या खासगी संस्थांची माहिती पाठविली आहे.

ठळक मुद्देविधिमंडळात गाजणार मुद्दा : निकाल, उत्तरपत्रिकांच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठातपरीक्षा आणि निगडित विविध कामे खासगी संस्थांना देण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १९ आमदारांनी आक्षेप घेतला आहे. येत्या अधिवेशनात याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.राज्य विधानमंडळ सचिवालयाने २८ जानेवारी रोजीच्या पत्रानुसार उच्च व तंत्रशिक्षण उपसचिवांना विधानसभेत तारांकित प्रश्न क्रमांक १८४ अन्वये विद्यापीठातपरीक्षा संबंधित आणि विविध कामे खासगी संस्थांना देण्यात आल्याविषयी अहवाल मागविला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानेसुद्धा परीक्षेशी निगडित कामे आणि नेमलेल्या खासगी संस्थांची माहिती पाठविली आहे. येत्या काळात परीक्षेच्या आॅनलाईन ‘एन्ड टू एन्ड’ कामाविषयी खासगी संस्थेची नेमणूक, करारनाम्याचा मसुदा तयार असल्याचे पाठविलेल्या अहवालात नमूद आहे. मात्र, परीक्षेशी निगडित कामे खासगी संस्थांना देण्याऐवजी विद्यापीठ स्तरावर यंत्रणा का उभारत नाही, असा आक्षेप आमदारांनी घेतला आहे. परीक्षेच्या एकूण कामासाठी खासगी संस्थांचा शिरकाव झाल्यामुळे निकाल, गुणवत्ता, गोपनीयतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. विद्यापीठ खासगी संस्थांना विद्यार्थ्यांची नोंदणीपासून ते पदवी देण्यापर्यंतच्या कामासाठी दरवर्षी कोट्यवधींची उधळण केल्याची बाबदेखील मांडल्या गेली आहे. परीक्षा विभागाचा कारभार गोपनीय असताना खासगी संस्थांच्या शिरकावामुळे गोपनीय माहितीचा गैरवापर होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे.पेपरफूट प्रकरण : सीआयडीचे चौकशीचे काय?संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सन २०१८-२०१९ या वर्षात अभियांत्रिकी मॅकेनिक्स या विषयाचे पेपरफूट प्रकरण विधिमंडळात गाजले. याप्रकरणी तिघांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले. मात्र, राज्य शासनाने याप्रकरणी सीआयडी चौकशीची घोषणा केली असताना ही चौकशी अद्यापही कागदोपत्रीच आहे. हा मुद्दासुद्धा येत्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याची माहिती राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली.तत्कालीन मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांचे तारांकितविद्यापीठात परीक्षांची कामे खासगी संस्थांना दिल्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्यासह १७ आमदारांनी तारांकित प्रश्नांद्वारे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे माहिती मागविली आहे. परीक्षांची कामे खासगी संस्थांना देण्याबाबत ‘अर्थकारण’ असल्याविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा