"माझी दारू का प्यायलीस?" : बापाने डोक्यावर काठी घालून केली मुलाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:32 IST2025-06-03T17:31:49+5:302025-06-03T17:32:27+5:30

Amravati : वरूड पोलिस घटनास्थळी, आरोपी पिता अटकेत, काठीने डोक्यावर मार

"Why did you drink my liquor?": Father kills son by hitting him on the head with a stick | "माझी दारू का प्यायलीस?" : बापाने डोक्यावर काठी घालून केली मुलाची हत्या

"Why did you drink my liquor?": Father kills son by hitting him on the head with a stick

लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड / जरुड :
स्वतःसाठी आणलेले दारू तरूण मुलगा प्यायल्याने संतापलेल्या बापाने मुलाच्या डोक्यावर काठीने प्रहार करून त्याला संपविले. तालुक्यातील बहादा येथे सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ती घटना घडली. दिलीप हिरामण धुर्वे (वय ३५, रा. बहादा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी पिता हिरामण जितुजी धुर्वे (वय ६५, रा. बहादा) याला अटक केली आहे. दिलीपने बापाने आणलेली दारू पिऊन घेतली. ती बाब समजताच  हिरामण याला संताप अनावर झाला. त्या वादादरम्यान हिरामण याने दिलीप याच्या डोक्यावर काठीने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.


मृत दिलीप हा विवाहित असून, त्याला पत्नी, पाच वर्षाची मुलगी व अडीच वर्षीय मुलगा आहे. ते सर्व कुटुंब एकत्र राहत होते. मात्र दिलीप हा कुठलाही कामधंदा न करता दारूच्या आहारी गेला होता. त्यातून त्यांचे रोजच वाद होत असे. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दारूच्या नशेत असताना बापलेकात वाद झाला. खुनाची घटना शेजाऱ्यांना माहिती होताच वरूड पोलिसांना माहिती देण्यात आली. वरूडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे, उपनिरीक्षक दीपक दळवी यांनी बहादा येथे जाऊन घटनास्थळ पंचनामा केला. तर एसडीपीओ संतोष खांडेकर यांनी देखील भेट दिली.

Web Title: "Why did you drink my liquor?": Father kills son by hitting him on the head with a stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.