लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. त्यामुळे महापालिकेत १७वे महापौर कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, राज्य शासनाने सोमवारी पत्र जारी करीत गुरुवार, २२ जानेवारी रोजी मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेत महापौरपदाचे आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
परिणामी अमरावतीचे नवे महापौरपद कोणत्या प्रवर्गसाठी आरक्षण निघते, याकडे राजकीय धुरंधरांच्या नजरा लागल्या आहेत. महापालिकेत २२ प्रभागांतून ८७ सदस्य निवडून आले आहे. महायुतीत महापौरपद हे भाजपच्या वाट्याला जाईल असे संकेत आहे. मात्र, अमरावती महापालिकेत आतापर्यंत महापौरपदाचे आरक्षण आणि रोटेशननुसार नवे महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव निघेल, अशी सूत्रांची माहिती आहे. १० मार्च १९९२ ते ८ मार्च २०२२ या ३० वर्षाच्या कार्यकाळात अमरावती महापालिकेत १६ महापौरांनी धुरा सांभाळली आहे. तर ९ मार्च २०२२ पासून तर आतापर्यंत महापालिकेत 'प्रशासकराज' सुरू आहे. भाजप २५, युवा स्वाभिमान पक्ष १५, काँग्रेस १५, एमआयएम १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ११, शिंदेसेना ३, बसपा ३, उद्धवसेना २ आणि वंचित १ असे ८७नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप, युवा स्वाभिमान व मित्रपक्षांची सत्ता स्थापन होईल, असे चित्र आहे.
काँग्रेसचीही सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल
अमरावती महापालिकेत बहुमत कोणत्याही राजकीय पक्षाला मिळाले नाही. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षाने सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल चालविली आहे. गत दोन दिवसांपासून काँग्रेसने एमआयएम, राष्ट्रवादी (अजित पवार), बसप, उद्धवसेना गटाच्या नेत्यांशी बोलणी सुरु केल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेसाठी '४४ मॅजिक फिगर' हा आकडा जुळविण्यासाठी जोर बैठकी वाढल्या आहेत.
सत्तास्थापनेसाठी लागेल ४४ संख्या बळ
महापालिकेवर युतीची सत्ता स्थापन होईल, असे राजकीय चित्र आहे. भाजपचा भगवा फडकविण्यासाठी पडद्यामागील अनेक वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महापालिका निवडणूक प्रभारी आ. संजय कुटे यासह स्थानिक नेते महापौर भाजपचाच होण्यासाठी तयारीला लागले आहेत. आता केवळ आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते यावरच पुढील रणनीती ठरणार आहे. महापौर उपमहापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेता ही महत्त्वाची पदे काबीज करण्यासाठी महायुती ४४ ही 'मॅजिक फिगर' जुळवत आहे.
आतापर्यंत १६ जणांनी भूषविले महापौरपद
डॉ. देवीसिंह शेखावत : १० मार्च १९९२प्रभाकर सव्वालाखे : ३० मार्च १९९३गोविंद अग्रवाल : २० मार्च १९९४विद्या देशपांडे : २० मार्च १९९५किरण महल्ले : ९ मार्च १९९६प्रवीणआप्पा काशीकर : १० मार्च १९९७नितीन वानखडे : २० मार्च १९९८विलास इंगोले : १९ मार्च १९९९दीपाली गवळी : ९ मार्च २००२मिलिंद चिमोटे : १८ फेब्रुवारी २००५अशोक डोंगरे : ९ मार्च २००७अॅड. किशोर शेळके: १ डिसेंबर २००९वंदना कंगाले : ९ मार्च २०१२चरणजितकौर नंदा : ९ सप्टेंबर २०१४संजय नरवणे : ९ मार्च २०१७चेतन गावंडे : २२ नोव्हेंबर २०१९
"महापौर आरक्षणासंदर्भात २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढणार असल्याचे नगरविकास विभागाने पत्र जारी केले आहे. त्यामुळे दोन दिवसांत अमरावती महापौरपदाचे आरक्षण जाहीर होईल. महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असेल, हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे."- संदीप वडूरकर, नगरसचिव, अमरावती महापालिका
Web Summary : Amravati awaits its 17th mayor. The mayoral reservation will be determined on Thursday. Political maneuvering intensifies as BJP and Congress vie for power in the 87-member corporation. All eyes are on the reservation category to decide the next strategy.
Web Summary : अमरावती को अपने 17वें महापौर का इंतजार है। महापौर आरक्षण गुरुवार को निर्धारित किया जाएगा। भाजपा और कांग्रेस के बीच 87 सदस्यीय निगम में सत्ता के लिए राजनीतिक जोड़तोड़ तेज हो गया है। अगली रणनीति तय करने के लिए सभी की निगाहें आरक्षण श्रेणी पर हैं।