प्रेमप्रकरणाचे बिंग फुटले तर प्रेयसीच्या वडिलांना भेटायला गेला; वादातून प्रकरणाला आले वेगळेच वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:56 IST2026-02-14T13:41:32+5:302026-02-14T13:56:05+5:30

Amravati : अल्पवयीन मुलीचे एका अल्पवयीन मुलाशी प्रेमप्रकरण असल्याचे बिंग फोन कॉलने फोडले. त्याचा कॉल तिच्या वडिलांनी उचलला. प्रकरण निस्तरण्यासाठी त्याला घरी बोलावले.

When the love affair broke up, he went to meet his girlfriend's father; the matter took a different turn after an argument | प्रेमप्रकरणाचे बिंग फुटले तर प्रेयसीच्या वडिलांना भेटायला गेला; वादातून प्रकरणाला आले वेगळेच वळण

When the love affair broke up, he went to meet his girlfriend's father; the matter took a different turn after an argument

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे (अमरावती) :
अल्पवयीन मुलीचे एका अल्पवयीन मुलाशी प्रेमप्रकरण असल्याचे बिंग फोन कॉलने फोडले. त्याचा कॉल तिच्या वडिलांनी उचलला. प्रकरण निस्तरण्यासाठी त्याला घरी बोलावले. यावेळी झालेल्या वादावादीत त्याने मुलीच्या वडील, काकांवर चाकूने हल्ला केला. या घटनेत तो अल्पवयीनदेखील जखमी झाला आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार होत आहेत.

चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावात १२ फेब्रुवारीच्या रात्री हा घटनाक्रम घडला. मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीसह त्या अल्पवयीनाला समजविण्यासाठी घरी बोलावले होते. यावेळी त्याने भाऊ व मित्राला सोबत घेतले होते. यावेळी वादावादी वाढली आणि त्याचा परिणाम दोन्ही बाजूने सशस्त्र हल्ल्यात झाले. अल्पवयीन प्रेमवीराने केलेल्या चाकूहल्ल्यात मुलीचे वडील, काका जखमी झाल्याचे चांदूर रेल्वे पोलिसात उशिरा रात्री दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे. त्यावरून त्या अल्पवयीनासह त्याच्या भावाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Web Title : प्रेम प्रसंग उजागर; पिता से मुलाकात हिंसक हमले में बदली।

Web Summary : एक किशोर का प्रेम प्रसंग फोन से उजागर हुआ। लड़की के घर बुलाए जाने पर हिंसक बहस हुई। लड़के ने लड़की के पिता और चाचा को चाकू मारा, खुद भी घायल हो गया। पुलिस ने उसके और उसके भाई के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Love affair exposed; meeting with father escalates to violent attack.

Web Summary : A teen's love affair was revealed via phone. Called to the girl's home, a violent argument ensued. The boy stabbed the girl's father and uncle, also sustaining injuries. Police have registered a case against him and his brother.