शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाटी-पेन्सील धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST

औरंगाबादेत अलीकडेच भीक मागण्यासाठी लहान मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. काही दिवसांपासून लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. परंतु, अमरावतीत लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच भीक मागण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे वास्तव आहे. वाहतूक सिग्नलवर मुुले भीक मागतात आणि आई-वडील पैसे गोळा करताना दिसतात.

गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी राज्य शासनाची ‘टॅग लाईन’ आहे. मात्र, ज्या हातात पाटी-पेन्सिल असावी त्या हातात भीक मागण्यासाठी कटोरा आला. हे विदारक चित्र शहरातील राजकमल, तहसील, पंचवटी, श्याम व इर्विन चौकात सिग्नलवर पाहावयास मिळत आहे. या निरागस बालकांना भीक मागण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांकडूनही बळ मिळत असल्याचे वास्तव आहे.
औरंगाबादेत अलीकडेच भीक मागण्यासाठी लहान मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. काही दिवसांपासून लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. परंतु, अमरावतीत लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच भीक मागण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे वास्तव आहे. वाहतूक सिग्नलवर मुुले भीक मागतात आणि आई-वडील पैसे गोळा करताना दिसतात. शासनाकडून विशिष्ट समुदायासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे नियोजन करण्यात आले असून, योजनादेखील आहेत. मात्र, निरक्षरता, अज्ञान, व्यसन, दारिद्र्य, कूप्रथामुळे विशिष्ट समुदायातील ही मुले भीक मागतात आणि भावी जीवनात ते वाममार्गाला लागत असल्याचे अनेक उदाहरण आहेत.

भीक मागतात त्याच भागात वास्तव्य
शहरातील राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ, पंचवटी चौकात भीक मागणारी मुले रात्री त्याच भागात आई-वडिलांसह वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. उड्डाण पुलाखालील जागा ही भिक्षेकऱ्यांचे आश्रयस्थान झाले आहे. पुलाखालीच ‘किचन’ थाटले जाते. रात्रीला उघड्यावर विश्रांती आणि दिवसा सिग्नलवर भीक मागणे, हा त्यांचा शिरस्ता आहे.

कोरोनाकाळात मुंबईहून आलेले कुटुंब स्थायिक
कोरोनाकाळात मुंबईहून अनेक कुटुंब अमरावतीत परतले. मात्र, दीड वर्षापासून ते अमरावतीतच भीक मागून उपजिविका भागविणे ही नित्याचीच बाब झाली आहे. भीक मागणारे बालके जिल्ह्यातील विविध भागातील आहेत. मात्र, ना शिक्षण, ना सामाजिक भान, अशीच त्यांची स्थिती आहे.  भीक मागणाऱ्या मुलांमुळे पोलीस वैतागले आहे. 

गुटखा, अन्य नशेच्या आहारी जाताहेत ही मुले
दिवसभर सिग्नलवर भीक मागून पैसा गोळा करणारी ही मुले गुटखा किंवा अन्य नशेच्या आहारी जात असल्याचे वास्तव आहे. शिक्षणाचा गंध नसल्यामुळे भविष्यात काय होईल, याचे भान नाही. त्यामुळे ही निरागस मुले बिनधास्तपणे नशेच्या आहारी जात आहेत. ही मुले आई-वडिलांसोबतच गुटखा निर्भिडपणे खात असल्याचे दिसून येत आहे.

भीक मागणारी काही मुले पोलीस सहकार्य व बालकल्याण समितीच्या आदेशाने ताब्यात घेऊन बालगृहात ठेवण्यात आले होते. मात्र, या मुलांच्या आई-वडिलांनी मोठा गोंधळ घातला. पोलिसांना त्रस्त केले. अखेर त्या मुलांना सोडून देण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार लवकरच या मुलांचे रेस्क्यू केले जाईल. 
- अमित कपूर, समन्वयक, चाईल्ड लाईन

 

टॅग्स :Beggarभिकारी