शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सैराट युवकांच्या भन्नाट दुचाकींना 'ब्रेक' केंव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2016 00:05 IST

महाविद्यालयीन विद्यार्थी व अल्पवयीन मुलांच्या भन्नाट दुचाकीमुळे दररोज अपघात घडून अनेक जण जखमी होत आहेत.

दररोज किरकोळ अपघात : दसरा मैदान, साईनगर रोडवर अनेक घटना अमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थी व अल्पवयीन मुलांच्या भन्नाट दुचाकीमुळे दररोज अपघात घडून अनेक जण जखमी होत आहेत. या मनमानी कारभारामुळे दसरा मैदान ते साईनगर मार्गाने जाणाऱ्या वाहन चालकांचा जीव टांगणीवर आहे. भुतेश्वर ते साईनगरपर्यंतच्या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थी व अल्पवयीन मुले भरधाव दुचाकी चालवित असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे. स्टंटबाजी करणारे दुचाकीस्वार अन्य दुचाकीला कट मारून पुढे निघून जातात. मात्र, या यामुळे अपघात घडून तो दुचाकीस्वार खाली कोसळून जखमी होत आहे. मात्र, हे सैराट युवक भरधाव वेगाने पुढे निघून जातात. या अपघातात जखमी नागरिकांना उचलून स्थानिक रहिवासी त्यांच्या जखमावर प्राथमिक उपचार करतात. असे किरकोळ अपघात दररोज घडत असले तरी एखादवेळी दुचाकीचालकाला जीव गमावावा लागू शकतो, याची पुसटशी कल्पनाही या भन्नाट युवकांना नसते. या मार्गाने पोलिसांसह सीआरओ वाहनांची गस्त अधूनमधून सुरूच असते. मात्र, तरीसुध्दा पोलिसांच्या दृष्टीस हे वेगाने जाणारे युवक का पडत नाहीत, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. किरकोळ अपघात घडल्यास वाहनचालक जवळच्याच एखाद्या दवाखान्यात उपचार करून घेतात. परंतु त्याची तक्रार पोलिसांपर्यंत येत नाही.मोठा अपघात झाल्यास त्याची नोंद पोलीस ठाण्यात होते. परंतु या अपघातात कुणी जायबंदी झाल्यास प्रकरणाला कधीकधी वेगळे वळण लागते. अशा सैराट दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप न केल्यास नागरिकच कायदा हातात घेऊन दुचाकीस्वारांना चोप देऊ शकतात. याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. दाम्पत्यासह चिमुकला बचावलादोन दिवसांपूर्वी साईनगरकडून राजापेठकडे दुचाकीने जाणाऱ्या एका दाम्पत्याच्या गाडीला नवाथेनगर चौकात अज्ञात दुचाकीस्वाराने कट मारला. दाम्पत्यासह दोन महिन्याचा चिमुकलाही कोसळला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली.सुदैवाने मोठा अपघात टळला. अनर्थ घडला असता तर जबाबदारी कुणाची? अशी चर्चा परिसरात होती. अधिसूचनेनंतरही शहरात जड वाहतूक सुरुच पोलीस विभागाने अधिसूचना काढून जड वाहतुकीस बंदी केली आहे. जिवनाश्वक वस्तुंच्या वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, तरी सुद्धा छुप्या मार्गाने शहरात जड वाहतूक सुरुच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या जड वाहतुकीमुळे मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यावर तातडीची उपायययोजना गरजेची असल्याचे चित्र आहे. भरधाव दुचाकी चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी ड्राईव्ह घेण्यात येईल. वाहतूक पोलीस तैनात करून दुचाकीस्वारांवर लक्ष ठेवून कारवाई करू. -पी.डी.डोंगरदिवे, सहायक पोलीस आयुक्त.