महाविद्यालयांत सॅनिटरी नॅपकीन मशीन्स केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST2020-03-05T06:00:00+5:302020-03-05T06:00:27+5:30
जिल्ह्यात दरवर्षी पावणेदोन ते दोन लाख मुली उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतात. मात्र, महिला, मुलींच्या आरोग्याबाबत सातत्याने दुर्लक्ष केले जाते. मासिक पाळीदरम्यान काळजी न घेतल्यास किशोरवयीन मुली, महिलांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. यातून निर्माण होणारे विकार, मानसिक अवस्थेतून बाहेर पडणे कठीण होते. त्यामुळे महिला, किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीन गरज भासेल तेव्हा कुठेही उपलब्ध करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला.

महाविद्यालयांत सॅनिटरी नॅपकीन मशीन्स केव्हा?
गणेश वासनिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिला, किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेडिंग, डिस्पोजल मशीन बंधनकारक केले आहे. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे पदव्युत्तर शिक्षण विभाग, प्रशासकीय कार्यालये, परीक्षा व मूल्यांकन विभागात ही सुविधा नाही. विद्यापीठ अंतर्गत ३९४ पैकी चार-दोन महाविद्यालये वगळता अन्य कोठेही ही सुविधा नाही. त्यामुळे उच्चशिक्षणात महिला, मुलींच्या आरोग्याची काळजी खरेच काळजी घेतली जाते का, असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी पावणेदोन ते दोन लाख मुली उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतात. मात्र, महिला, मुलींच्या आरोग्याबाबत सातत्याने दुर्लक्ष केले जाते. मासिक पाळीदरम्यान काळजी न घेतल्यास किशोरवयीन मुली, महिलांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. यातून निर्माण होणारे विकार, मानसिक अवस्थेतून बाहेर पडणे कठीण होते. त्यामुळे महिला, किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीन गरज भासेल तेव्हा कुठेही उपलब्ध करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. परंतु, विद्यापीठ, महाविद्यालये दरवर्षी लाखोंचे अनुदान घेत असताना ही सुविधा उपलब्ध करून देत नाहीत. विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात ही सुविधा नाही, अशी धक्कादायक माहिती आहे.
विद्यापीठात ६६ महिला कर्मचारी
विद्यापीठात ६६ महिला कर्मचारी कार्यरत आहे. यात शिक्षकेतर ४७, तर शिक्षण विभागात १९ कर्मचारी आहेत. रोजंदारी, दैनंदिन वेतनावर महिलांची संख्या अधिक आहे. मुलींच्या वसतिगृहात सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशीन्सची सुविधा नसल्याची माहिती आहे.
विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग, डिस्पोजल मशीन्स बंधनकारक असावे. तसेही ‘नॅक’ मानांकनात ही बाब मँडेटरी आहे. मुली शिकवणी वर्गात असो वा महाविद्यालयात, त्यांना या मशीन्सची गरज पडू शकते.
- वैशाली गुडधे, समन्वयक, महिला अभ्यास केंद्र, अमरावती
मासिक पाळीच्या काळात महाविद्यालयात वर्गास हजर राहणे, अभ्यासासह घरची काही कामे करताना मानसिक दबाव असतो. त्यामुळे महाविद्यालयात मशीन्स अनिवार्य असावी.
- एक विद्यार्थिनी, महिला महाविद्यालय, अमरावती.
मुलींचे वसतिगृह, लेडीज कॉमन रूममध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग, डिस्पोजल मशीन्स वर्षभरापूर्वी लावण्यात आल्या. ‘नॅक’ नामांकनाच्या अनुषंगाने महिला, किशोरवयीन मुलींसाठी ही सुविधा महाविद्यालयात आहे.
- वि.गो. ठाकरे, प्राचार्य, शिवाजी विज्ञान महाविद्यालय