शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅप्रोच’ मार्गाचा अडसर हटणार कधी?

By admin | Updated: December 11, 2014 22:57 IST

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, अकोला-यवतमाळ राज्य महामार्गाला जोडणाऱ्या जळू गावापर्यंतच्या ‘अ‍ॅप्रोच’

बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण : शासनाकडे फाईल पडून, पावणेचार किलोमीटरचा प्रश्न
अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, अकोला-यवतमाळ राज्य महामार्गाला जोडणाऱ्या जळू गावापर्यंतच्या ‘अ‍ॅप्रोच’ रस्त्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. परिणामी विमानतळाचे विस्तारीकरण रखडले असून पावणेचार किलोमीटर मार्गाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागणार? हा सवालदेखील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे,
बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ७५० एकर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानतळाचे विस्तारीकरण
सौंदर्यीकरणाची जबाबदारी भारतीय विमानतळ प्रािधकरणाकडे सोपविली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणात आताच्या १४०० मीटर धावपट्टीऐवजी २४०० मीटरची धावपट्टी निर्माण केली जाणार आहे.
एवढेच नव्हे, जमीन अधिग्रहणासाठी ५५ कोटी रुपयांचे वाटप प्रकल्पग्रस्तांना करण्यात आले आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाकरिता २० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याकरिता ४ कोटी रुपये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देणे शिल्लक आहे. मात्र, अकोला महामार्गाहून जळू ते निंभोरा या पावणेचार किलोमिटरच्या अ‍ॅप्रोच रस्त्याच्या निर्मितीसाठी लागणारे १३.५० कोटी रूपये शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अद्यापही मंजूर केले नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला या अ‍ॅप्रोच रस्ता निर्मितीच्या निविदा काढता आल्या नाहीत.
विस्तारीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची गरज भागणार आहे. असे असताना अ‍ॅप्रोच रस्त्याच्या निर्मितीसाठीच निधी नसेल तर भविष्यात बेलोरा विमानतळाचे काही खरे नाही, अशी प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आहे.
गत महिन्यात आ. सुनील देशमुख यांच्या विशेष उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
यावेळी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव मीनादेखील हजर होते. त्यावेळी यावर चर्चा झाली होती.