पश्चिम विदर्भात १११.२ टक्के पाऊस; अमरावती जिल्ह्यात १०९.१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:58 PM2020-08-22T17:58:31+5:302020-08-22T17:58:58+5:30

अमरावती विभागात मागील वर्षी २२ ऑगस्टपर्यंत १५५ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा ९४.७६ टक्के पाऊस झाला होता.

West Vidarbha receives 111.2 per cent rainfall; 109.1 in Amravati distric | पश्चिम विदर्भात १११.२ टक्के पाऊस; अमरावती जिल्ह्यात १०९.१

पश्चिम विदर्भात १११.२ टक्के पाऊस; अमरावती जिल्ह्यात १०९.१

Next

अमरावती : जिल्ह्यात १ जून ते २२ ऑगस्टपर्यंत सरासरी ४२३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा ४६१.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३८७.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना ४३०.७ मिमी पाऊस पडल्याची माहिती जलसंपदा विभागातून प्राप्त झाली आहे.

अमरावती विभागात मागील वर्षी २२ ऑगस्टपर्यंत १५५ मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा ९४.७६ टक्के पाऊस झाला होता. मात्र, यंदा अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात १ जून ते २२ ऑगस्ट दरम्यान ५२७.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना ३५६.६ मिमी झाला. याची टक्केवारी ६७ टक्के इतकी आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३९७.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना सर्वाधिक ५६६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. चिखलदरा तालुक्यात ६३७ मिमी  सरासरी असताना ४३०.३ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

अमरावतीत ४५५.९ मिमी (१०५.३ टक्के), भातकुली ४९८.२ मिमी (१३६.१ टक्के), चांदूर रेल्वे ४०७.७ मिमी (११०.२ टक्के), तिवसा ३६६.९ मिमी (११०.८ टक्के), मोर्शी ४८० मिमी (१२४.८ टक्के), वरूड ५००.७ मिमी (१२४.६ टक्के), दर्यापूर ५४५ मिमी (१८५.२ टक्के), अंजनगाव सुर्जी ४५२ मिमी (१४९.४ टक्के), अचलपूर  ३७७.८ मिमी (९२.९ टक्के), चांदूर बाजार ४१०.४ (१५०.९ टक्के), तर धामणगाव रेल्वे तालुक्यात सरासरी ४८० मिमी पाऊस अपेक्षित असताना ४१०.४ मिमी (८५.५ टक्के)  पावसाची नोंद झालेली आहे.

Web Title: West Vidarbha receives 111.2 per cent rainfall; 109.1 in Amravati distric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.