शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीचा ऑटो लवकरच पंक्चर करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:18 IST

कॅप्शन - पत्रपरिषदेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे, विक्रांत पाटील, आ. प्रवीण पोटे, किरण पातूरकर ------------------------------------ चंद्रकात बावनकुळे यांचा इशारा, मुख्यमंत्र्यांना ...

कॅप्शन - पत्रपरिषदेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे, विक्रांत पाटील, आ. प्रवीण पोटे, किरण पातूरकर

------------------------------------

चंद्रकात बावनकुळे यांचा इशारा, मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कळेना

अमरावती : महाविकास आघाडीला सत्तेचा माज आला असून, हा तीनचाकी ऑटो लवकरच पंक्चर केला जाईल, असा इशारा राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकात बावनकुळे यांनी दिला आहे.

बावनुकळे हे ‘युवा वॉरियर्स’ अभियानांतर्गत अमरावतीत गुरुवारी आले असता, पत्रपरिषदेतून भाजपची पुढील वाटचाल विशद केली. १८ ते २५ वयोगटातील युवक, युवतींना देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्यासाठी हा उपकम असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहे. येत्या जिल्हा परिषद, महापालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप जनतेपर्यंत पाेहोचून महाविकास आघाडीने भकास कसे केले, याची माहिती देणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदेशीर अटक केली, हे न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन देऊन सिद्ध केले आहे. शिवसेनेला सत्तेचा माज आला आहे. येत्या निवडणुकांमध्ये सेनेला जागा ठेवणार नाही, असे भाजपचे नियोजन आहे. अमरावती शहरात शिवसेनेने धुडघूस घातला असून, गुंड सैनिकांना अटक व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कळत नाही, राज्य कसे कळणार, असा टोलाही लगावला. याबाबत भाजपकडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले जाणार आहे. पत्रपरिषदेला भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, शहराध्यक्ष किरण पातूरकर, आमदार प्रवीण पोटे, महापौर चेतन गावंडे, भाजपचे पक्षनेता तुषार भारतीय, माजी मंत्री अनिल बोंडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी उपस्थित होते.

-----------------

भाजप-युवा स्वाभिमान एकत्र नाही

भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र निवडणूक लढणार नाही, ही बाब चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली. आमदार रवि राणा हे भाजपचे सहयाेगी सदस्य आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद अथवा नगर परिषद निवडणुका भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र लढणार, ही केवळ चर्चा असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.