शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 6:45 PM

पश्चिम विदर्भातील मोठे, लघु व मध्यम अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

- संदीप मानकर 

अमरावती  - पश्चिम विदर्भातील मोठे, लघु व मध्यम अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांतसुद्धा सरासरी ७०.२९ टक्के पाणीसाठा साचला आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ६७.१३ टक्के पाणीसाठा असून, ४६९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ४९.९५ टक्के पाणीसाठा आहे.  मागील चार दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत आहे. विदर्भात पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. परतीच्या पावसात अनेक प्रकल्प शंभरी गाठतील, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वर्तविला आहे. जलसंपदा विभागाने १४ सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार ५०२ प्रकल्पांत सरासरी ६२.७७ टक्के पाणीसाठा साचला आहे. या प्रकल्पांत प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ३१७४.११ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा  १९९२.३० दलघमी आहे. दोन आठवड्यांत आणखी पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.  नऊ मोठ्या प्रकल्पांत ७०.२९ टक्के पाणीसाठाअमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्प १०० टक्के भरला असून तीन गेट १० सेमींने उघडले आहेत. वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदा धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे अमरावती शहरातील पिण्याच्या पाण्यासह या प्रकल्पातून होणाºया ७५ हजार हेक्टर सिंचनाची सोय झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस या मोठ्या प्रकल्पात ४३.६३ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात १२.९९ टक्के, बेंबळा प्रकल्पात ९८.३४ टक्के पाणीसाठा असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली असून २३.३९ पाणीसाठा आहे. टक्के, वान प्रकल्पात ९३.४६ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ३४.५५ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ९४.२० टक्के पाणीसाठा असून दोन गेट १० सेंमीने उघडण्यात आले आहे. खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ६८ टक्के पाणीसाठा अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९४.४० टक्के पाणीसाठा असून ७.५ सें.मी. ४ गेट उघडले आहेत. चंद्रभागा प्रकल्पात ९३.९९ पाणीसाठा असून ५ सेंमीने दोन गेट उघडले आहे. पूर्णा प्रकल्पात ९१.३८ टक्के पाणीसाठा असून १५ सेंमीने दोन गेट उघडण्यात आले आहे.  सपन प्रकल्पात ९६.२७ टक्के पाणीसाठा असून १० सेंमीने चार गेट उघडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस मध्यम प्रकल्पात ९७.६४ टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ५२.८९ टक्के, वाघाडी ७६.५० टक्के, बोरगाव ८९.७१ टक्के नवरगाव १०० टक्के,  अकोला जिल्हा निर्गुणा ३४.११ टक्के, मोर्णा ३८.८१टक्के. उमा २५.२६ टक्के, घुंगशी बॅरेजमध्ये पहिल्यांदाच २६.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील अडाण १३.३४ टक्के, सोनल ४१.३७ टक्के, एकबुर्जी ४९.७१ टक्के, बुलडाणा जिल्हा ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ६१.२३ टक्के, तोरणा ९६.२० टक्के उतावळी ६५.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीVidarbhaविदर्भWaterपाणी