शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचना, आरक्षणावर २६ आक्षेप

By admin | Updated: July 17, 2016 00:05 IST

जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचना व आरक्षण यावर १४ जुलैपर्यंत आक्षेप व हरकती जिल्हा प्रशासनाने मागविल्या होत्या.

नऊ पालिका : जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष १९ जुलैपासून सुनावणीअमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचना व आरक्षण यावर १४ जुलैपर्यंत आक्षेप व हरकती जिल्हा प्रशासनाने मागविल्या होत्या. अंतिम मुदतीपर्यंत ७ नगरपरिषदेत २६ आक्षेप दाखल झालेत तर २ नगरपरिषद निरंक आहेत. यावर १८ ते २२ जुलैदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी होऊन प्रारूप रचनेला अंतिम स्वरुप देण्यासाठी आराखडे विभागीय आयुक्तांकडे जाणार आहे.जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, धामणगाव, दर्यापूर, वरूड, शेंदूरजनाघाट या नगरपंचायतींचा कालावधी १६ डिसेंबर २०१६ या कालावधीत संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी सार्वत्रिक निवडणूका होत आहे. त्याअनुषंगाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाद्वारे विविध प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या नऊही नगरपरिषदांमध्ये २०११ मधील जनगणनेच्या आधारावर प्रभाग रचना करण्यात आली व २ जुलै रोजी प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले, प्रभाग रचना व सदस्यपदांचे आरक्षण यावर ४ ते १४ जुलै या कालावधीत आक्षेप मागविण्यात आले होते. या १० दिवसात २६ आक्षेप नगर विकास कार्यालयास प्राप्त झाले आहे. यामध्ये अचलपूर नगरपरिषदेसाठी ३ आक्षेप, अंजनगाव सुर्जी ८, चांदूरबाजार २, चांदूररेल्वे ३, मोर्शी ३, शेंदूरजनाघाट ४, दर्यापूर ३ व धामणगाव नगरपरिषदसाठी ३ आक्षेप दाखल झाले आहेत. वरूड व शेंदूरजनाघाट येथे आक्षेप निरंक आहेत. या सर्व ठिकाणी १८ ते २२ जुलै दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी होणार आहे. यासाठी पुराव्यासह उपस्थित रहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)आक्षेपांवर मंगळवारपासून सुनावणीजिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागात नऊ नगरपरिषदांसाठी रीतसर आक्षेप नोंदविण्यात आले. याची सुनावणीसाठी नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत. सुनावणी ही अचलपूरसाठी २२ जुलै, अंजनगाव सुर्जी २० जुलै, चांदूरबाजार १८ जुलै, चांदूररेल्वे २१ जुलै, मोर्शी १९ जुलै, दर्यापूर १९ जुलै व धामणगाव रेल्वे २१ जुलै रोजी राहणार आहे.गुगल मॅपद्वारे प्रभाग रचनाजिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेसाठी यावेळी प्रथमच गुगल मॅपचा वापर करण्यात आला. त्यामुळे प्रभागातील गट आणि त्यानुसार केलेली रचना यामुळे आक्षेपांची संख्या कमी झाली. केवळ ७ नगरपरिषदांमध्ये २६ आक्षेप दाखल झाले तर २ नगरपरिषदांमध्ये आक्षेप निरंक आहेत.