शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती कारागृहाच्या भिंती होणार कलरफुल

By admin | Updated: September 6, 2016 00:15 IST

परंपरागत पांढऱ्या रंगाच्या असलेल्या कारागृहाच्या पाषाण भिंती आता लोकसहभागातून कलरफुल करण्याचा निर्णय सोमवारी कारागृह प्रशासनाने घेतला आहे.

गणेशोत्सव साजरा : पीडित कुटुंबीयांसाठी बंदीजनांचा पुढाकारअमरावती : परंपरागत पांढऱ्या रंगाच्या असलेल्या कारागृहाच्या पाषाण भिंती आता लोकसहभागातून कलरफुल करण्याचा निर्णय सोमवारी कारागृह प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सवापासून या अभिनव उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला असून यात विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे अभिवचन दिले आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी येथील मध्यवर्ती कारागृहात विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित करण्यात आले. यावेळी वऱ्हाड संस्था, आर्ट आॅफ लिव्हिंग, दिशा संस्था, ओम शांती, अवेरनेस संस्था, आर. के. मेलोडीज आदी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दरम्यान कारागृहात सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती अधीक्षक ढोले यांनी दिली. कारागृहांच्या भिंती या ब्रिटिशकालीन असून त्या भिंतीना नवा लूक देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. पाषाण भिंतीच्या आत हातून कळत न कळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित शिक्षेच्या रुपात भोगणाऱ्या कैद्यांच्या मनात वैफल्य निर्माण होऊ नये, यासाठी त्यांचे मन प्रसन्न व प्रफुल्लीत राहावे, यासाठी कारागृहाच्या भिंतीना वेगवेगळा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला येथील आॅर्ट आॅफ लिव्हिंगने पूर्णत्वास नेण्याचा मानस व्यक्त केला. तसेच कॅरम खेळण्यासाठी पावडर उपलब्ध करून देण्याची मागणी काही कैद्यांनी केली असता ती देखील आॅर्ट आॅफ लिव्हिंगने मान्य केली. दरम्यान कुमुदिनी इंगळे यांनी कारागृहातील बंदीजनांना बॉलपेन वाटप करण्याचा निर्णय घेतला. गणेशोत्सवात पहिल्यांदाच कैदी एकत्र आले होते, हे विशेष. कैद्यांनी कायदेविषयक प्रश्न, समस्या मांडताना त्या सामाजिक संस्थांनी सोडविण्याचे आश्वासित केले. यावेळी वऱ्हाड संस्थेचे प्रमुख रवींद्र वैद्य, कुमुदिनी इंगळे, अमित सहारकर, राजेश पछेल, प्रवीण खानपासोळे, कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, तुरुंगाधिकारी प्रवीण मोडकर, माळशिखरे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी भूषण कांबळे, महापालिका उपअभियंता बोबडे, सुभेदार तिवस्कर, सुभेदार पांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सहा बंदीजनांनी मदतीचा घेतला वसा समाजात पिडीत असलेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी बंदीजनांनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना श्रमातून मिळविलेली कमाई ही समाजाच्या कामी यावी, यासाठी सहा बंदीजनांनी पडिीत कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे ठरविले आहे. पिडीत कुटुंबियांपर्यत ही आर्थिक मदत पोहचविण्यसाठी वऱ्हाड संस्था पुढाकार घेणार आहे. यात वामन फड, सुरेश दाभाडे, बंटी उप्पलवार, ज्ञानदेव सोनोने, सुनील तातयडे, गणीराम ठाकरे या बंदीजनांना समावेश आहे.