शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

वॅगन कारखाना निविदेत अडकला

By admin | Updated: June 27, 2015 00:20 IST

बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना निविदा प्रक्रियेत अडकला आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : प्रकल्पग्रस्त्यांच्या जमिनी ताब्यातअमरावती : बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना निविदा प्रक्रियेत अडकला आहे. गत आठ महिन्यांपासून निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याने ती केंव्हा पूर्ण होणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण यापूर्वीच करण्यात आले आहे.माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेला रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना तांत्रीक अडचणीतून बाहेर पडलेला नाही. मोठा गाजावाजा करुन या प्रकल्पाची प्रसिद्धी घेणारे नेते हल्ली कोठे गायब झालेत, हे कळेनासे झाले आहे. गत नऊ महिन्यांपासून या प्रकल्पाला निविदा प्रक्रियेतून बाहेर काढण्याचे सौजन्य दाखविले जात नसल्याने बेरोजगारांमध्ये संतापाची लाट पसरल्याचे दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची पायाभरणी करणार अशी माहिती पुढे आली होती. परंतु जून महिना संपायला आला असला तरी निविदा प्रक्रियाच आटोपली नसल्याची वास्तविकता आहे. रेल्वे विभागाने हा कारखाना निर्माण करण्याची जबाबदारी पटना येथील रेल्वेच्या बांधकाम विभागाकडे सोपविली आहे. या कारखान्याच्या निर्मितीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने खास करुन उपअभियंता मोहन नाडगे यांची नियुक्त ी केली आहे. हा कारखाना बडनेरा येथील पाचबंगला परिसरात साकारला जाणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या कारखान्याचे भूमिपूजन होईल, असे संकेत रेल्वे विभागाने दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी पेरणीपासून वंचित राहावे लागले अशी ओरड प्रकल्पग्रस्तांची आहे. दोन वर्षांपूर्वीच या कारखान्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असताना निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी एक ते दीड वर्षे लागत असतील तर हा कारखाना निर्माण करायला १० वर्ष लागतील काय? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकरी तैयब अली सैयद कादर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)६४ शेतकऱ्यांची ७८ हेक्टर जमीन ताब्यातप्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यासाठी ५४ शेतकऱ्यांची ७८ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. १५ कोटी ३२ लाख रुपये प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात आला आहे. या प्रकल्पात २३ घरे तर १०९ लोकसंख्या बाधीत होणार आहे.वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या भूमिपूजनाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावे, यासाठी त्यांना पत्र देण्यात आले आहे. पटना येथील रेल्वेच्या बांधकाम विभागाकडे या कारखान्याची निर्मिती, निविदा प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी सोपविली आहे. किमान तीन निविदा येणे अपेक्षित आहे. काही तांत्रीक अडचणी आल्या असतील तर त्या त्वरेने सोडविल्या जातील.- आनंदराव अडसूळ, खासदार.रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे या निविदा प्रक्रियेला उशीर होत आहे. परंतु पुढील महिन्यात ती पूर्ण होईल, असे संकेत आहेत. पटना रेल्वे बांधकाम विभागाकडे या कारखान्याच्या निर्मितीची जबाबदारी आहे.- मोहन नाडगे, उपअभियंता, रेल्वे.