​Varud E- Bus Rikshaw Accident : ​वरुडजवळ भीषण अपघात ! ई-बस आणि रिक्षाच्या धडकेत ४ जण ठार, ३ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:31 IST2026-02-18T13:26:49+5:302026-02-18T13:31:50+5:30

Amravati : राजुराबाजार-वरुड रेल्वे क्रॉसिंगवर आज सकाळी १०.३० च्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

​Varud E- Bus Rikshaw Accident : ​Fearful accident near Varud! 4 killed, 3 seriously injured in collision between e-bus and rickshaw | ​Varud E- Bus Rikshaw Accident : ​वरुडजवळ भीषण अपघात ! ई-बस आणि रिक्षाच्या धडकेत ४ जण ठार, ३ गंभीर जखमी

​Varud E- Bus Rikshaw Accident : ​Fearful accident near Varud! 4 killed, 3 seriously injured in collision between e-bus and rickshaw

वरुड :  राजुराबाजार-वरुड रेल्वे क्रॉसिंगवर आज सकाळी १०.३० च्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. एका भरधाव ई-बस आणि ऑटो  रिक्षामध्ये  झालेल्या भीषण धडकेत रिक्षामधील ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एका शाळकरी विद्यार्थीनीचा समावेश आहे. तीन जखमींपैकी अन्य एकाचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याचे समजते. मात्र प्रशासनाने त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. धडकेमुळे मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरुड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. या भीषण अपघातामुळे वरुड परिसरात शोककळा पसरली असून, वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. गंभीर जखमींना नागपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मृतदेहांना वरूड ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले आहे.

Web Title : वरुड के पास ई-बस, रिक्शा की टक्कर में चार की मौत

Web Summary : वरुड के पास एक दर्दनाक ई-बस और ऑटो-रिक्शा की टक्कर में एक छात्रा सहित चार लोगों की मौत हो गई। तीन अन्य गंभीर रूप से घायल हैं और उन्हें नागपुर में इलाज के लिए ले जाया गया है। रिक्शा पूरी तरह से नष्ट हो गया। पुलिस जांच कर रही है, और इलाके में शोक है।

Web Title : Tragic E-Bus, Rickshaw Collision Near Varud Claims Four Lives

Web Summary : A devastating e-bus and auto-rickshaw collision near Varud resulted in four fatalities, including a student. Three others are critically injured and were moved to Nagpur for treatment. The rickshaw was completely destroyed. Police are investigating, and the area is in mourning.