कडा भरण्यासाठी निकृष्ट मुरूम, काळ्या मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:19+5:302021-02-05T05:33:19+5:30

वरूड-रवाळा राष्ट्रीय महामार्ग, डांबरीकरणही थातूरमातूर वरूड : तालुक्यातील वरूड ते रवाळा या टप्प्यातील राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडल्याने या रस्त्याच्या ...

The use of inferior pimples, black clay to fill the edges | कडा भरण्यासाठी निकृष्ट मुरूम, काळ्या मातीचा वापर

कडा भरण्यासाठी निकृष्ट मुरूम, काळ्या मातीचा वापर

वरूड-रवाळा राष्ट्रीय महामार्ग, डांबरीकरणही थातूरमातूर

वरूड : तालुक्यातील वरूड ते रवाळा या टप्प्यातील राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडा भरण्याचे कार्य सुरू आहे. परंतु, या कडा भरताना मुरूम टाकणे आवश्यक असताना एका बाजूने निकृष्ट मुरूम, तर दुसऱ्या बाजूने काळी माती टाकून निकृष्ट काम केले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, वरूड ते रवाळा या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडून डांबर निघाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यामुळे रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कंत्राटदाराकडून रस्त्यावर डांबराचा थर टाकण्यात आला. हे कामसुद्धा निकृष्ट झाल्याची ओरड आहे. रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. तेथेही थोड्याशा दबावाने भुगा होणारा निकृष्ट मुरूम टाकला, तर दुसऱ्या बाजूला काळी मातीसह दगड टाकल्या जात असून शासनाच्या पैशांचा चुराडा होत आहे. बांधकाम विभागाने या कामाची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

---------

कोट - येत आहे.

Web Title: The use of inferior pimples, black clay to fill the edges