शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत पाचच्या नोटांची अघोषित बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:21 IST

शहरात पाच रुपयांच्या अघोषित नोटबंदीने अमरावतीकरांना संभ्रमात पाडले आहे. चलनातील पाच रुपयांच्या नोटा न स्वीकारणे हा फौजदारी गुन्हा ठरत असतानाही अमरावती शहरातील अनेक व्यापारी वर्ग मनमानी कारभार चालवून पाच रुपयांच्या नोटा घेत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाच रुपयांची नोट न स्वीकारणाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे आता गरजेचे आहे.

ठळक मुद्देकसा हा मनमानी कारभार? : कायदा म्हणतो, हा तर फौजदारी गुन्हा; जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख घेणार का दखल?

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात पाच रुपयांच्या अघोषित नोटबंदीने अमरावतीकरांना संभ्रमात पाडले आहे. चलनातील पाच रुपयांच्या नोटा न स्वीकारणे हा फौजदारी गुन्हा ठरत असतानाही अमरावती शहरातील अनेक व्यापारी वर्ग मनमानी कारभार चालवून पाच रुपयांच्या नोटा घेत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाच रुपयांची नोट न स्वीकारणाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे आता गरजेचे आहे.केंद्र शासनाने पाचशे व हजाराची नोट चलनातून बांद केल्यानंतर देशभरातील नागरिक संभ्रमात पडले होते. त्यावेळी नागरिकांनी पाचशे व एक हजारांच्या सर्व नोटा बँकेत जमा केल्या. त्यानंतर पाचशे व दोन हजारांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. हळूहळू १०० व ५० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. मात्र, पाच, दहा व वीस रुपयांच्या जुन्याच नोटा ठेवण्यात आल्या. त्या नोटांबाबत नवीन नियमावली नसून, त्या आजही चलनात आहेत. गेल्या काही महिन्यांत अमरावतीत शहरातील अनेक छोट्या-मोठ्या व्यापाºयांनी अचानक पाच रुपयांच्या नोटा स्वीकारणेच बंद करून टाकले आहे. हा प्रकार एका व्यापाºयाकडून दुसºया व्यापाºयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यापारी पाच रुपयांच्या नोटा स्वीकारतच नसल्याचे दिसून येत आहे. या अघोषित नोटबंदीमुळे शहरातील अनेकांकडे पाचच्या नोटांचा खच जमलेला आहे. पाचच्या नोटा स्वीकारणे बंद झाल्यामुळे शहरात चिल्लरचा तुटवडादेखील निर्माण झाला आहे. पाचची नोट घेऊन काही खरेदी करण्यासाठी गेल्यास, ती नोट चालत नसल्याचे थेट व्यापारी सांगत आहे. त्यामुळे अनेक जण पाचची नोट घेऊन या दुकानातून त्या दुकानात चकरा मारतानाही दिसत आहे. पाचची नोट खपविताना तर अनेकांचे व्यापाºयांशी वादसुद्धा झाले आहेत. त्यामुळे गोरगरिबांना तर पाचची नोट खर्च करण्याचा प्रश्नच पडला आहे. याशिवाय अमरावतीकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कायद्यातील तरतुदीत ज्या नोटा चलनात आहे, त्या नोटा स्वीकारणे प्रत्येकालाच बंधनकारक आहे. जर कोणीही चलनातील नोटा स्वीकारत नसेल, तर त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार करण्याचा अधिकारी नागरिकांना आहे.पाच रुपयांची नोट देऊ कुणाला?माझे किरकोळ किराणा स्टोअर्स असल्याने सकाळी दूधविक्रीसह आवश्यक साहित्य खरेदीकरिता ग्राहक येतात. काहींनी दिलेल्या पाच रुपयांच्या नोटा मी इतर व्यापाऱ्यांना दिल्या असता, त्या स्वीकारल्या नाहीत. अद्याप माझ्याकडे १४ नोटा जमा झालेल्या असून, काही ग्राहक अद्यापही पाच रुपयांची नोट घेऊन येत असल्याने त्यांना समजावतो आहे. मात्र, शासनाने अधिकृतरीत्या पाच रुपयांच्या नोटा बंद झाल्याचे घोषित केलेले नसल्याने आम्ही स्वीकारतो तुम्हीही स्वीकारा ना, असे ते सांगतात. ग्राहकाला परत पाठवित राहिल्यास धंदा कसा होईल. त्यामुळे उधारी वाढू लागली आहे, असे गजानननगरातील एका किराणा व्यावसायिकांने सांगितले.काय म्हणतो आरबीआयचा नियम?रिझर्व्ह बॅक आॅफ इंडिया अ‍ॅक्टच्या करन्सी रेग्युलेशन अंतर्गत चलनातील नोटांची देवाण-घेवाण करणे गरजेचे आहे. चलनातील नोटा न स्वीकारणे हा आरबीआय अ‍ॅक्टनुसार गुन्हा ठरतो. चलनातील नोटा न स्वीकारणांºयाविरुद्ध कोणी तक्रार केल्यास कलम १८८ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.लोकमत प्रतिनिधीचा अनुभवपाच रुपयांची नोट बंद झाली असल्याने आम्ही ती नोट घेत नसल्याचे अनेक व्यापारी वर्ग सांगत आहे. याचा थेट अनुभव घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी शहरातील काही व्यावसायिकांकडे वस्तू खरेदी करून पाचची नोट दिली असता, ती त्या व्यापाऱ्याने स्वीकारली नाही. यानंतर ‘लोकमत’ने अन्य व्यापाºयांकडे जाऊन शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता, मती भ्रमित करणाराच अनुभव प्रतिनिधीला आला. उपाहारगृह, पानटपरी, किराणा दुकान, दूध विक्री केंद्र, भाजीपाल्याच्या हातगाड्या, फेरीवाले अशा दहा ते बारा जणांंना पाच रुपयांची देण्याचे प्रयत्न केला असता, त्यांनी ती नोट बंद झाल्याचे सांगून स्वीकारलीच नाही. या व्यापाऱ्यांना पाचची नोट सुरु असल्याची मुद्दामच जाणून करून दिली. मात्र, तरीही त्यांनी स्वीकारली नाही.पाच रुपयांची नोट चलनात आहे. ती नोट बंद झाल्याचा संभ्रम नागरिकांमध्ये असेल, तर तो त्वरित काढावा. ती नोट नागरिक व व्यापाºयांनी स्वीकारलीच पाहिजे.- मुकेश दलालमुख्य व्यवस्थापकआरबीओ, क्षेत्रीय कार्यालयआरबीआयच्या नियमानुसार पाच रुपयांची नोट चलनात आहे. त्यामुळे ती नोट न स्वीकारणे तर्कसंगत नाही. अशा लोकांविरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकते. नोट स्वीकारली जात नसल्यास नागरिकांनी तक्रार करावी.- यशवंत सोळंकेपोलीस उपायुक्तआरबीआयच्या कायद्यातील तरतुदीनुसार पाच रुपये चलनात आहे. या चलनातील नोटा न स्वीकारणे म्हणजे आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन करणे होय. पाच रुपयांची नोट चलनात आहे. ती कोणी स्विकारत नसेल, तर तो गुन्हा ठरतो. याबाबत पोलीस तक्रार झाल्यास कलम १८८ नुसार कारवाई होई शकते.- विश्वास वैद्य, विधी अधिकारी, पोलीस आयुक्तालय