शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

यूजीसीचे महाविद्यालयांना निर्देश, ‘नॅक’ नाही तर अनुदान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST

अनुदानित १५२ पैकी ३३ महाविदयालये ‘नॅक’पासून दूरच, अमरावती विद्यापीठ संलग्न ३८४ महाविद्यालये अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोेगाने ‘नॅक’मूल्यांकन ...

अनुदानित १५२ पैकी ३३ महाविदयालये ‘नॅक’पासून दूरच, अमरावती विद्यापीठ संलग्न ३८४ महाविद्यालये

अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोेगाने ‘नॅक’मूल्यांकन न करणारे महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांवर ताशेरे ओढले आहे. चालू शैक्षणिक वर्षात नॅक’ मूल्यांकन केले नाही तर, अनुदान मिळणार नाही, असा रोखठोक पवित्रा घेतला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत अनुदानित १५२ पैकी ३३ महाविद्यालयांनी अद्यापही ‘नॅक’ केले नसल्याची माहिती आहे.

यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी २९ जानेवारी रोजी जारी केलेल्या पत्रानुसार उच्च शिक्षण संस्थांचे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) विद्यार्थी, शैक्षणिक उपक्रम आदींसाठीच्या पायाभूत सोईसुविधांची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत महाविद्यालय अथवा उच्च शिक्षण संस्थांनी ‘नॅक’ मूल्यांकन केले नाही तर अशा संस्थांचे अनुदान बंद करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत यूजीसीने दिले आहे. तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांचेही ‘नॅक’ मूल्यांकन करून घेणे विद्यापीठांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्याकरिता विद्यापीठाचे नॅशनल ईन्स्टिट्यूट ऑफ रॅंकींग फ्रेमवर्क विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनुदानित, विनाअनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकन होणे यूजीसीचे गाईडलाईन आहे. कोरोना काळात महाविद्यालये बंद होती. आता १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होत असून, येत्या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडून महाविद्यालयांना तपासणी करणे आवश्यक आहे. अन्यथा ‘नॅक’कङून मिळणाऱ्या अनुदानावर चाप बसेल, असे संकेत यूजीसीने दिले आहेत.

-------------

विभागात ३३ महाविद्यालयांचे ‘नॅक’ नाही

अमरावती विद्यापीठ अंतर्गत १५२ पैकी ३३ महाविद्यालयांचे अद्यापही ‘नॅक’ झाले नाही. त्यापैकी ४ महाविद्यालयांना ‘नॅक’ समितीकडून भेट दिली जाणार आहे. स्वंयमूल्यनिर्धारण अहवालात चार महाविद्यालयांनी ‘नॅक’कडे सादर केला आहे. पाच महाविद्यालयांनी ‘आयआयक्यूए’ सादर केल्याची माहिती आहे.

----------------

विनाअनुदानित महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकनाची जबाबदारी विद्यापीठाची आहे. अनुदानित महाविद्यालयांवर उच्च शिक्षण विभागाचे नियंत्रण आहे. त्याअनुषंगाने ‘नॅक’ मू्ल्यांकनासाठी महाविद्यालयांशी पत्रव्यवहार सुरू आहे. निश्चित वेळेत ‘नॅक’ झाले नाही तर अनुदान बंद केले जाईल, असे यूजीसीने निर्देश दिलेत.

- केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण, अमरावती