दुचाकी चोरी; अमरावतीतून चोरल्या; गडचिरोलीला विकल्या!

By प्रदीप भाकरे | Updated: June 18, 2025 16:41 IST2025-06-18T16:40:45+5:302025-06-18T16:41:50+5:30

राजापेठ पोलिसांकडून सहा गुन्हे उघड : ५.२० लाख रुपयांच्या दुचाकी जप्त

Two-wheeler theft; stolen from Amravati; sold to Gadchiroli! | दुचाकी चोरी; अमरावतीतून चोरल्या; गडचिरोलीला विकल्या!

Two-wheeler theft; stolen from Amravati; sold to Gadchiroli!

प्रदीप भाकरे 
अमरावती : अमरावती शहराच्या विविध भागातून महागड्या दुचाकी चोरून त्या गडचिरोलीत नेऊन विकणाऱ्या दोन आरोपींसह त्या घेणाऱ्यासदेखील अटक करण्यात आली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी दोन स्थानिक चोरांसह गडचिरोलीच्या रिसिव्हरलादेखील जेरबंद केले. आरोपींकडून एकुण सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांच्या अटकेमुळे शहर आयुक्तालयातील सहा गुन्हयांचा उलगडा झाला आहे.

साहिल अनिल राऊत (२०, रा. खरैया नगर, महेंद्र कॉलनी, अमरावती), पराग मनीष अग्रवाल (वय २४ वर्षे, रा. धनश्री कॉलनी, दस्तुर नगर, अमरावती) व अझर फारूक हुसेन सिददीकी (वय २९ वर्षे, रा. रामनगर, गडचिरोली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. १७ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. येथील दर्शन जावरकर यांची एम एच २७ डिआर ९४५२ ही ८० हजार रुपये किमतीची दुचाकी ३० मे रोजी एमआयडीसी रोडवरील गोल्डन टेम्पल, श्रीकृष्ण मंदीरासमोरून चोरीला गेली होती. ते दर्शन घेऊन परतल्यानंतर त्यांना दुचाकी दिसून आली नव्हती. त्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला होता.
 

साहिलने दिली कबुली
राजापेठ पोलिसांनी माहितीच्या आधारे साहिल राऊतला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, त्याने आपण पराग अग्रवाल याच्या साथीने गोल्डन टेंपलसमोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. आपण राजापेठ व आयुक्तालयातील अन्य ठिकाणांहून चोरलेल्या दुचाकी गडचिरोली येथील अझर फारूक याला विकल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आरोपी साहिल व अझर फारूककडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपीने त्या दुचाकी शहरातील विविध ठिकाणांहून चोरल्या होत्या.

यांनी केली कारवाईपोलीस आयुक्त अरविंद चावरीया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट, उपनिरिक्षक मिलिंद हिवरे, हवालदार मनीष करपे यांच्या डीबी स्कॉडने ही कारवाई केली.

Web Title: Two-wheeler theft; stolen from Amravati; sold to Gadchiroli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.