शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा-चिरोडी जंगलात दोन वाघ

By admin | Updated: January 7, 2017 00:09 IST

पोहरा-चिरोडी वनपरिक्षेत्रात एक नव्हे दोन वाघांच्या ्नखुणा आढळल्या आहेत.

वनकर्मचाऱ्यांना व्याघ्रदर्शन : वनविभाग ‘अलर्ट’, बिबट्यांनीही हलविला मुक्कामअमोल कोहळे पोहरा बंदीपोहरा-चिरोडी वनपरिक्षेत्रात एक नव्हे दोन वाघांच्या ्नखुणा आढळल्या आहेत. इतकेच नव्हे तर वरूड्याच्या जंगलात वनकर्मचाऱ्यांचा चक्क वाघाशी सामना झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल ८० किलोमीटरचा प्रवास करून पोहरा-चिरोडी जंगलात वाघाचे आगमन सुखावणारे असले तरी दोन वाघांचे अस्तित्व असल्याने या जंगलातील बिबट्यांनी जंगल परिसरातून काढता पाय घेतला आहे. पोहरा-चिरोडी जंगलात बिबट्यांची संख्या २० ते २५ च्या घरात आहे. काही दिवसांपासून बोर व्याघ्र प्रकल्पातील दोन पट्टेदार वाघांचे जंगलात आगमन झाले आहे. वाघांनी ज्या भागात आपला घरोबा केला त्या भागातील बिबट्यांनी जागा सोडली असून संघर्षाऐवजी दुसरी जागा शोधताना बिबट्यांची दमछाक होत आहे. जंगलात प्रवेश मनाई अमरावती : या जंगलात चितळ, रोही, हरिण, सांबर, रानडुकरांची संख्या अधिक असल्याने बिबट्यांना पोषक वातावरण आहे. वन्यप्राणी अधिक असल्याने बिबट आणि आता वाघांचे अस्तित्वदेखील या जंगलात वाढीस लागले आहे. हे वाघ दोन महिन्यांपासून १५ ते २० किमीच्या परिघात फिरत आहेत. सोमवारी जंगलगस्तीवर असलेल्या चिरोडी वर्तुळातील दोन वनरक्षक आणि दोन वनमजुरांना ५ वाजताच्या सुमारास वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. जंगलात वाघ आल्याने बिबट्यांनी पोहरा, चिरोडी, बोडणा, सावंगा, कस्तुरा, हातला, भालखेड, इंदला, कारला, मार्डी गावाच्या शेतापर्यंत येण्याची मजल गाठली आहे. बिबट्यांनी शेतशिवारात मुक्त संचार सुरू केल्याने जंगलातील तलावावर जनावरांना पाणी पिण्याकरिता जाऊ देऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच नागरिकांनीसुद्धा पूर्वपरवानगीशिवाय जंगलात प्रवेश करू नये, असे वनविभागाद्वारे सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)वनविभागाचे सगळे लक्ष वाघांकडे पोहरा-चिरोडी जंगलात वाघांचे आगमन झाल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाचे व वन्यप्रेमींचे सगळे लक्ष या वाघांकडे लागून राहिले आहे. उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी पोहरा-चिरोडी जंगल परिसरात २० ट्रॅप कॅमेरे लावले असून दोन्ही वनवर्तुळाचे कर्मचारी मॉनिटरिंंग करित आहेत. पुन्हा दुसऱ्या वाघाचे जंगलात आगमन झाल्याने चिरोडी-पोहऱ्याचे वनकर्मचारी अधिकारी त्यांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत. बोर ते पोहरा कॅरिडोर हवेबोर व्याघ्र प्रकल्पातील वाघ पोहरा- चिरोडी ये-जा करित असल्याने या मार्गावर कॅरिडोर करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोरमधील वाघांचा या भागातील वावर आता वारंवार सिद्ध झाला आहे. वनक्षेत्रानजिकच्या तलावावर जनावरांना पाणी पिण्यास जाऊ देऊ नये. ग्रामस्थांना देखील प्रवेशबंदी केली आहे. तशा सूचना वनकर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.- अनंत गावंडे, वनपरिक्षेत्राधिकारी