शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांवर मराठे एकवटणार

By admin | Updated: September 6, 2016 00:10 IST

कोपर्डी प्रकरणाच्या निषेधासह मराठा आरक्षणाची मागणी बुलंद करण्यासाठी अमरावतीमध्ये २२ सप्टेंबर रोजी मराठ्यांचा महामोर्चा निघणार आहे.

२२ ला शक्तीप्रदर्शन : जातीचा नव्हे प्रवृत्तीचा विरोध अमरावती : कोपर्डी प्रकरणाच्या निषेधासह मराठा आरक्षणाची मागणी बुलंद करण्यासाठी अमरावतीमध्ये २२ सप्टेंबर रोजी मराठ्यांचा महामोर्चा निघणार आहे. हा मूकमोर्चा परभणीप्रमाणे रेकॉर्डब्रेक होण्यासाठी मराठे एकवटले असून मोर्चाचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. या मोर्चात दोन लाखांपेक्षा अधिक मराठे सहभागी होणार आहेत.उल्लेखनीय म्हणजे या मोर्चाला कुठलाही राजकीय किवा अराजकीय चेहरा नाही. केवळ आणि केवळ मराठा म्हणून यात लाखो मराठे सहभागी होणार आहेत. या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी रविवार ४ सप्टेंबर रोजी स्थानिक अभियंता भवनात पहिली बैठक घेण्यात आली. बैठकीला शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना रोखण्यासाठी कडक कायदे करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी मराठे २२ सप्टेंबरला जिल्हाकचेरीवर धडकणार आहेत. कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणाने मराठा पेटून उठला. उरात पेटलेली ती आग मोर्चाच्या स्वरूपात प्रकटणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी तालुकास्तरावर समिती नेमण्यात आल्या आहेत. सांघिक नेतृत्वात सोशल मीडियाचा आधार घेत अगदी गावस्तरावर मराठा समूहाला एकवटण्याचे शिवधनुष्य हाती घेण्यात आले आहे. २२ सप्टेंबरच्या या मोर्चात सुमारे दोन लाख मराठा सहभागी होतील, अशाप्रकारचे सूक्ष्म नियोजन विविध आघाड्यांवर केले जात आहे. नियोजनाची पुढील बैठक रविवार ११ सप्टेंबरला होणार आहे. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असावा, या दृष्टीनेही प्रयत्न केले जात आहेत. मराठयांचा हा मोर्चा कुण्या जातीविरोधात नव्हे तर प्रवृत्तीच्या विरोधात काढला जाणार आहे.