शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचे अवैध लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

मोजमाप केले असता, सदर लाकडे २०.९९१  घनमीटर होती. अंदाजे किंमत १ लाख ९९ हजार एवढी असून यामध्ये निंब, बाभूळ, हिवर, शिवण, चिचोरा, बेहाडा जातीची आडजात वृक्ष होते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. वृक्षतोड या परिसरात होत असल्याचे  चित्र आहे. याबाबत कुणीही व्यक्ती मालक म्हणून पुढे आली नसल्याने नेमकी ही लाकडे कुणाची, हा प्रश्न आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील मौजा जरूडमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या बाजूला आडजातीची २०.९९१ घनमीटर लाकडे पडीक जागेत आणून ठेवली होती. या परिसरात वृक्षतोड सुरू असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाल्यावरून घटनास्थळ गाठले. कापून ठेवलेल्या  लाकडाचा पंचनामा करून लाकडे जप्तीची कारवाई करण्यात आली. अवैध लाकडाची १ लाख ९९ हजार रुपये किंमत असून, अद्याप कुणीही मालक पुढे आला नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, मौजा जरूड परिसरात जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेच्या टाकीमागे खुल्या पडीक जागेमध्ये अवैध वृक्षतोड करून लाकडे आणून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दुपारी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पलता बेंडे, शेकदरी वर्तुळाच्या वनपाल देवश्री नवले, वनरक्षक मंगेश जंगले, दिलीप वाघमारे, नवेद काझी, वाहनचालक आकाश मानकर, वनकर्मचारी युवराज कनाठे, सतीश गायकवाड यांच्या पथकांनी जाऊन घटनास्थळावरील अवैध लाकडाचा पंचनामा केला. मोजमाप केले असता, सदर लाकडे २०.९९१  घनमीटर होती. अंदाजे किंमत १ लाख ९९ हजार एवढी असून यामध्ये निंब, बाभूळ, हिवर, शिवण, चिचोरा, बेहाडा जातीची आडजात वृक्ष होते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. वृक्षतोड या परिसरात होत असल्याचे  चित्र आहे. याबाबत कुणीही व्यक्ती मालक म्हणून पुढे आली नसल्याने नेमकी ही लाकडे कुणाची, हा प्रश्न आहे. तथापि, याच सुमारास आरागिरणीचालक लाकडाच्या साठ्याची टेहळणी करताना दृष्टीस पडले. गुन्हा नेमका कुणावर दाखल झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग