दर्यापूर तालुक्यात दोन शेतक-यांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 19:41 IST2019-08-19T19:41:04+5:302019-08-19T19:41:32+5:30
दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दोन शेतकरी आत्महत्याची नोंद करण्यात आली.

दर्यापूर तालुक्यात दोन शेतक-यांची आत्महत्या
येवदा (अमरावती) : दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दोन शेतकरी आत्महत्याची नोंद करण्यात आली.
वडनेर गंगाई येथील अमोल रामराव माहोरे (३५) या तरुण शेतक-याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. आपल्यावर कर्जाचा बोझा असल्याने आपण आत्महत्या करीत असल्याची अमोलने मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्तपरिवार आहे. दर्यापूर तालुक्यातीलच राजखेड येथील प्रशांत रंगराव दळवी (२७) याने नैराश्यातून आत्महत्या केली. १८ ऑगस्ट रोजी दुपारी घरी कुणी नसताना त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्यामागे आई व भाऊ असा आप्त परिवार आहे. येवद्याचे ठाणेदार तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पोळकर व त्यांचे सहकारी तपास करीत आहे.