शहरं
Join us  
Trending Stories
1
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
4
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
5
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
6
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
8
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
10
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
11
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
12
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
13
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
14
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
15
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
16
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
17
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
18
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
19
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
20
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Daily Top 2Weekly Top 5

बाजारदरानेच रेशन दुकानातही तूरडाळ

By admin | Updated: July 8, 2016 00:03 IST

तुरडाळीच्या भडकलेल्या दरांमुळे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांच्या ताटातील डाळ गायब झाली आहे. महागाईच्या या कचाट्यात जगणे अवघड होऊन बसले आहे.

शासनाकडून थट्टा : शिधापत्रिकेवर मिळणार किलोभर डाळ
जितेंद्र दखने अमरावती
तुरडाळीच्या भडकलेल्या दरांमुळे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांच्या ताटातील डाळ गायब झाली आहे. महागाईच्या या कचाट्यात जगणे अवघड होऊन बसले आहे. यापासून काहीसा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ५ जुलै रोजी अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिका कार्डधारकांना प्रत्येक महिन्याला एक किलो तूरडाळ देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला आहे. मात्र या निर्णयावर जनसामान्यातून टिकेचा सूर उमटला आहे. बाजारामध्ये १२० ते १३० प्रतिकिलो दराने तूरडाळ उपलब्ध असतांना ५ ते ६ सहाजणांच्या कुटुंबाला १ किलो डाळ आणि तीही बाजारभावाने, ही गोरगरिबांची सरकारने केलेली थट्टाच असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. अनेकांना संताप व्यक्त करून १२० रूपयांनी नव्हे तर २० रूपयांनी डाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार ९३२ कुटुंबांना ही डाळ १२० रूपये प्रतिकिलो मिळणार आहे.
डाळीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा शासनाला अपयश आले. यामुळे लोकांमध्ये शासनाविरोधी नाराजी पसरली आहे. यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज्यातील ७० लाख कुटुंबांना रेशनिंगच्या माध्यमातून महिन्याला १ किलो तूरडाळ देण्यात येणार आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यामधील अंत्योदय १ लाख १७ हजार ९०४ आणि बिपीएलच्या १ लाख ६१ हजार २८ अशा दोन्ही मिळून २ लाख ७८ हजार ९३२ शिधापत्रिकाधारकांना ही डाळ स्वस्त धान्य दुकानात मिळणार आहे. मात्र तूरडाळीचे दर १२० रुपये किलो राहणार असल्यामुळे गोरगरीब नागरिकांना या दराने डाळ खरेदी करणे शक्य आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

डाळीबाबत आदेश नाहीत
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेशनिंगवर अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना तूरडाळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र याबाबत पुरवठा विभागाला अद्याप कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. याबाबत राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून जे आदेश मिळतील त्यानुसार स्वस्त धान्य दुकानामार्फत याबाबत अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

१२० रुपये प्रतिकिलो प्रमाणे तूरडाळ देण्याच्या निर्णयामुळे काहीही फरक पडणार नाही. दुकानात १२० रुपये तर बीपीएलवर २० रुपये किलोप्रमाणे तूरडाळ दिली पाहिजे. तरच गोरगरिबांना तूरडाळ खरेदी करता येईल.
- बबलू देशमुख,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

खरीप हंगामात तूृर पिकाची पेरणी झाली असली तरी प्रत्यक्षात फेब्रुवारी अखेरीस शेतकऱ्यांची तूर बाजारपेठेत येईल. मध्यंतरीच्या काळात सर्वसामान्यांना भाववाढीपासून वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
सुनील देशमुख,आमदार

शासनाने रेशन दुकानातील इतर धान्या प्रमाणेच तूरडाळ सवलतीच्या दरात सर्व ग्राहकांना मिळायला पाहीजे. तूर डाळीबाबत पुरवठा विभागाच्या रेशन दुकानांना सुचना नाहीत.
- सुरेश पाटील उल्हे
अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना

बाजारपेठेत असलेल्या तूर डाळीच्या जुळत्या भावात स्वस्त धान्य दुकानात १२० रुपये प्रमाणे डाळ मिळत असली तरी त्यात गुणवत्ता राहणार नाही.
- अजय गाडे
संघटन मंत्री, अ.भा. ग्राहक पंचायत