शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चालकाने विकला कांदा, व्यापाऱ्याचा झाला वांदा

By admin | Updated: July 26, 2014 23:53 IST

व्यापाऱ्याचा कांदा ट्रकमध्ये घेऊन जाणाऱ्या चालकाने वाटेतच परस्पर कांदा विकून व्यापाऱ्याचा मोठा वांदा केला. वलगाव पोलीस ठाण्यांतर्गत शनिवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली.

पोलीस ठाण्यात तक्रार : आरोपी गजाआडअमरावती : व्यापाऱ्याचा कांदा ट्रकमध्ये घेऊन जाणाऱ्या चालकाने वाटेतच परस्पर कांदा विकून व्यापाऱ्याचा मोठा वांदा केला. वलगाव पोलीस ठाण्यांतर्गत शनिवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. रमेश महादेव मडावी (३२,रा. पांढुर्णा खुर्द ता. घाटंजी) असे परस्पर कांदा विक्री करणाऱ्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. यवतमाळ येथील सारस्वत ले-आऊट येथील रहिवासी रौनक अली रौऊफ अली हे ट्रान्सपोर्टचे व्यापारी आहेत. त्यांच्या एम. एच. ३४ एम ७९६ क्रमांकाच्या ट्रकवर रमेश मडावी हा दोन महिन्यांपासून चालक आहे. रमेशने अचलपूर येथील बालाजी ट्रान्सपोर्ट येथून रामविजय भैयालाल जटीये यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपये किमतीचे २३७ पोते कांदे ट्रकमध्ये भरले. शुक्रवारी रात्री ८ वाजता तो कांदा घेऊन आंध्रप्रदेशातील निजामाबाद येथे मो. सलीम अ‍ॅन्ड कंपनीमध्ये जाण्यासाठी निघाला. वलगाव येथे त्याने तेथे दारु ढोसली. तेथे कांद्याचे कट्टे विकणे सुरु केले. तेथील सुफीनगरात रमेश हा स्वस्त दरात कांदा विक्री करीत असल्याची माहिती वलगाव येथील रहिवासी बंडून कलाने यांना मिळाली. त्यांनी रमेशकडून २०० रुपये प्रती कट्ट्याने १२० कट्टे कांदा खरेदी केले. ही कांद्याची पोती कलाने याने त्याच्या ट्रॅक्टरमध्ये भरली. कमी भावात ते गावात कांदा विकत होते. ही बाब तेथील काही नागरिकांच्या निदर्शनास आली. संशयाच्या आधारावर त्यांनी ही माहिती वलगाव पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक आर. के. शर्मा, उपनिरीक्षक सपाटे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मडावी व कलाने या दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान रमेशने मालकाची फसवणूक करुन वाटेतच कांद्याची परस्पर विक्री केल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. ही माहिती त्यांनी ट्रक चालक रौनक अली यांना दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रमेश मडावीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. आरोपीच्या ताब्यातून १२५ पोते कांदा जप्त करण्यात आले. (प्रतिनिधी)