शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहांना आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न

By admin | Updated: August 11, 2015 00:26 IST

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत बांधलेल्या नवीन शासकीय वसतिगृहांना सर्व सुविधायुक्त करुन आयएसओ दजार्चे मानांकन मिळवण्यासाठी प्...

राजकुमार बडोले : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहाचे लोकार्पणनांदगाव खंडेश्वर : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत बांधलेल्या नवीन शासकीय वसतिगृहांना सर्व सुविधायुक्त करुन आयएसओ दजार्चे मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी केले. नांदगाव खंडेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार श्रीकांत देशपांडे, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण डी.आर. वडकुते, सहायक आयुक्त डी.डी. फिस्के, समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण उपस्थित होते. शासकीय वसतिगृहांमध्ये उच्च प्रतिचे वाचनालय, अभ्यासिका या सुविधेसोबतच भविष्यात शासकीय निवासी शाळांमध्ये सी.बी.एस.इ पध्दतीचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही बडोले यांनी सांगितले. मुलींच्या वसतिगृहात कटाक्षाने महिला गृहपालांना प्राध्यान्य देण्यात येईल. गृहपालांच्या रिक्त पदांची भर्ती लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी पुढे नमुद केले. बार्टीच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जमाती,अनुसुचित जाती प्रवर्गासाठीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी स्पर्धा परीक्षा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आमदार निधीतून या वसतिगृहातील विद्यार्थींसाठी वॉटर प्युरिफायर व वॉटर कुलर भेट देण्याची घोषणा केली. स्थानिक आमदार वीरेंद्र जगताप यांनी नांदगाव खंडेश्वर येथील प्रियदर्शनी शासकीय मुलींच्या वसतिगृहाची क्षमता ५० वरुन १०० करण्याची मागणी केली. त्यालाही मंत्र्यांनी तत्काळ होकार दिला. यावेळी तत्कालीन उपअभियंता पळसकर, बांधकाम व्यवसायिक नितीन गभने, तत्कालीन सहायक अभियंता संजीव काळे आदींचा गौरव करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)