धामणगावात ३५ मध्ये त्रिकोणी, १८ ग्रामपंचायतींमध्ये दुहेरी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:11+5:302021-01-14T04:11:11+5:30

४२८ जागांवर निवडणूक, प्रचार आटोपला, ८७ हजार ५४६ मतदारांच्या बोटाला लागणार शाई मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५३ ...

Triangular in 35 in Dhamangaon, double struggle in 18 gram panchayats | धामणगावात ३५ मध्ये त्रिकोणी, १८ ग्रामपंचायतींमध्ये दुहेरी संघर्ष

धामणगावात ३५ मध्ये त्रिकोणी, १८ ग्रामपंचायतींमध्ये दुहेरी संघर्ष

Next

४२८ जागांवर निवडणूक, प्रचार आटोपला, ८७ हजार ५४६ मतदारांच्या बोटाला लागणार शाई

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी त्रिकोणी संघर्ष आहे, तर १८ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवार आमने-सामने लढत देत आहेत. दरम्यान, ८७ हजार ५४६ मतदारांनी १ हजार ९९ उमेदवारापैकी ४२८ सक्षम उमेदवार निवडून देण्याची, तर ६७१ उमेदवाराला पराभूत करण्याची यादी तयार केली आहे. मतदान १५ जानेवारीला आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यात गत पाच दिवसांत अनेक गावांत संघर्षमय, तर काही गावांत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुकीचा प्रचार आटोपला. एकीकडे पाच वर्षांत सत्ताधारी गटाने केलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे विरोधी गटाने मतदारांसमोर मांडले, तर सत्तेत असलेल्या गटाने आतापर्यंत केलेल्या विकासाची उदाहरणे मतदारांना पुराव्यासहित दिली आहेत. पाच वर्षांत गावात कोणता विकास करणार आहोत, शासनाच्या कोणत्या योजना आणणार आहोत, असे प्रसिद्ध केलेेले जाहीरनामे दोन्ही गटांनी मतदारांसमोर ठेवले आहे विशेष म्हणजे, काही गावांत उमेदवारांनी एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यावर टीकेची झोड प्रचारादरम्यान उठवली असल्याचे प्रचारादरम्यान दिसले.

या गावांमध्ये रंगला तिहेरी संघर्ष

तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, जुना धामणगाव, तळेगाव दशासर, भातकुली देवगाव, अंजनसिंगी, जळगाव आर्वी, पिंपळखुटा, कावली, वरूड बगाजी, विरुळ रोंघे, जळका पटाचे, विटाळा, चिंचपूर, निंभोरा राज, वडगाव राजदी, हिंगणगाव, बोरगाव धांदे, सोनेगाव खर्डा यांसह ३५ गावांत त्रिकोणी संघर्ष निर्माण झाला आहे. या गावांत प्रत्येकी तीन गट निवडणूक लढत आहेत. अपक्ष उमेदवारांची त्यात भर पडली आहे.

---------------

माजी प्राचार्यांचे पॅनेल

कावली येथे माजी प्राचार्यांनी या निवडणुकीत पॅनेल टाकून निवडणुकीत रंगत आणली आहे. नऊ जागांसाठी पिंपळखुटा येथे तब्बल ४२ उमेदवार रिंगणात असल्याने विकास करणाऱ्या उमेदवाराला येथील मतदार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून देणार आहे.

-------------

१८ गावांमध्ये दुहेरी लढत, नायगावात एका जागेसाठी तीन उमेदवार

तालुक्यात आदर्श ठरलेल्या ग्रामपंचायत झाडा येथे पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. तब्बल पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नायगाव येथील सहा जागा अविरोध झाल्या, केवळ प्रभाग क्रमांक १ मध्ये एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे हे गाव शासनाच्या बक्षीस योजनेपासून वंचित झाले आहे. झाडगाव, तिवरा, दाभाडा दिघी महल्ले, निंबोली, निंभोरा राज, पेठ रघुनाथपुर, बोरवघड, बोरगाव निस्ताने, रायपूर कासारखेड, वकनाथ, वसाड, वाठोडा बुद्रुक, कळाशी, उसळगव्हाण, आजनगाव, कामनापूर घुसळी, जळगाव, तळणी वाघोली, वाढोणा, ढाकूलगाव, अशोकनगर, गव्हा निपाणी, गव्हा फरकाडे, शिंदोडी, शेंदूरजना खुर्द, सावळा, हिरपूर येथे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी दोन गटांत ही निवडणूक आहे.

---------------

६७१ उमेदवार झाले निश्चित

तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमधील १ हजार ९९ उमेदवारांपैकी ४२८ योग्य व गावाचा विकास करणाऱ्या उमेदवारालाच मतदार निवडून देणार आहेत, तर ६७१ उमेदवाराचा पराभूत होणार आहे. विजयी व पराभूत करणाऱ्या उमेदवारांची यादी मतदानाला २४ तास शिल्लक असताना मतदारांकडे निश्चित झाली आहे. १८० मतदार केंद्रांवर ४४ हजार ७८५ पुरुष व ४२ हजार ७६१ महिला अशा ८७ हजार ५४६ मतदारांच्या बोटाला या ग्रामपंचायत निवडणुकीत शाई लागणार आहे.

Web Title: Triangular in 35 in Dhamangaon, double struggle in 18 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.