शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचे प्रशिक्षण लटकले नि नोकरीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

काेरोनाचा फटका : निवड झालेल्या १८३ चालक-वाहकांचे प्रशिक्षण अपूर्ण अमरावती: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागातील चालक ...

काेरोनाचा फटका : निवड झालेल्या १८३ चालक-वाहकांचे प्रशिक्षण अपूर्ण

अमरावती: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागातील चालक तथा वाहकांच्या २३० रिक्त पदांसाठी फेब्रुवारी २०२० मध्ये २ हजार २८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १८३ उमेदवार पात्र ठरले आहेत. मात्र, काेरोनाच्या प्रार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने पात्र उमेदवारांना नियुक्तीच दिली नाही तसेच त्यांचे प्रशिक्षण अर्धवट झाले आहे. त्यामुळे उमेदवारांपुढे रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

महामंडळाच्या अमरावती विभाग येथे कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून चालक-वाहक( ड्रायव्हर कम कंडक्टर) पदाच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केलेली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये पात्र झालेले हे उमेदवार अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत असून, याबाबत अद्यापही महामंडळाने ठोस निर्णय घेतलेला नाही. पात्र १८३ उमेदवारांपैकी ४८ दिवसांचे ६६ जणांचे प्रशिक्षण झाले, तर ७२ जणांचे प्रशिक्षण सुरू आहे आणि ८० दिवसांचे प्रशिक्षण २९ दिवसांचे सुरू होते. मात्र, कोरोनामुळे सध्या स्थगित केले आहे.

बॉक्स

२२८८ जणांनी जिल्ह्यातून केले होते अर्ज

१८३ जणांची झाली निवड

१०१ जणांचे प्रशिक्षण अर्धवट आहे.

बाॅक्स

कोरोनामुळे लटकले

१०१ तरुणांची निवड होऊनही त्यांना अद्याप परिवहन विभागाकडून प्रशिक्षण पूर्ण दिलेले नाही. ते शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहेत.

कोट

एसटी महामंडळाने आम्हाला निवडीचे पत्रे दिले. परंतु, वर्षभरापासून प्रशिक्षण थांबले आहे. सध्या कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे महामंडळ प्रशिक्षण घेईल, अशी अपेक्षा आहे.

- श्याम ठाकरे, चालक-वाहक

कोट

कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे एसटी महामंडळाने आमचे प्रशिक्षण घ्यावे, अशी मागणी आहे. काही चालक- वाहकांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. आमचा नंबर कधी येणार, याची प्रतीक्षा आहे.

- अनिरुद्ध ढवळे, चालक-वाहक

कोट

कोरोनामुळे प्रशिक्षण थांबविण्यात आले होते. बसवाहतूक बंद असल्यामुळे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या चालक - वाहकांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेले प्रशिक्षण देण्याबाबत वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे प्रशिक्षणाची कार्यवाही लवकच पूर्ण केली जाईल.

- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, अमरावती