अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू

By प्रदीप भाकरे | Updated: April 7, 2026 10:06 IST2026-04-07T10:06:21+5:302026-04-07T10:06:41+5:30

अमरावतीमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Tragedy on Amravati Akola Highway 4 Badnera Youths Killed 3 Critically Injured in Road Accident | अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू

अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू

अमरावती: अमरावती-अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात बडनेरा येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोरा विमानतळाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. विशेष म्हणजे, अपघातात प्राण गमावलेले चारही तरुण बडनेरा जुनी वस्ती येथील रहिवासी असल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा येथील सात युवक मध्यरात्री चहा पिण्यासाठी बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये गेले होते. चहा घेऊन परतत असताना त्यांची कार अनियंत्रित होऊन रस्त्याकडच्या झाडावर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

​मृतकांत मोहम्मद अनस मोहम्मद सईद (वय २०, रा. बडनेरा जुनी वस्ती), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (वय २२, रा. बडनेरा जुनी वस्ती), मोहम्मद अवेझ मोहम्मद सईद (वय २६, रा. बडनेरा जुनी वस्ती) व अब्दुल अनवेस अब्दुल सलीम (वय २२, रा. बडनेरा जुनी वस्ती) यांचा समावेश असल्याची माहिती बडनेरा पोलिसांनी दिली.

या अपघातानंतर संबंधित ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत. कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

​जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार

या अपघातातील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी अमरावती येथील बडनेरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांच्यावर सतत उपचार करत आहेत. एकाच भागातील चार तरुणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने बडनेऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपघाताची नोंद केली आहे.

Web Title : अमरावती-अकोला राजमार्ग हादसा: चाय पीकर लौट रहे चार युवकों की मौत

Web Summary : अमरावती-अकोला राजमार्ग पर बेलोरा हवाई अड्डे के पास एक दुखद दुर्घटना में चार युवकों की मौत हो गई और तीन घायल हो गए। बडनेरा के निवासी पीड़ित, चाय पीकर लौट रहे थे जब उनकी कार एक पेड़ से टकरा गई।

Web Title : Amravati-Akola Highway Accident: Four Youths Die Returning From Tea

Web Summary : Four youths died and three were injured in a tragic accident on the Amravati-Akola highway near Belora airport. The victims, residents of Badnera, were returning from a tea break when their car crashed into a tree.