काटकुंभ येथे ट्रॅक्टर अपघात, एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 13:24 IST2017-10-26T13:24:10+5:302017-10-26T13:24:27+5:30
नांगरणी करून दुसऱ्या शेतात नेताना ट्रॅक्टर उलटून अपघात झाला आहे. यामध्ये चालक ठार, एक गंभीर जखमी झाल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ शेतशिवारात गुरुवारी घडली.

काटकुंभ येथे ट्रॅक्टर अपघात, एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
अमरावती- नांगरणी करून दुसऱ्या शेतात नेताना ट्रॅक्टर उलटून अपघात झाला आहे. यामध्ये चालक ठार, एक गंभीर जखमी झाल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ शेतशिवारात गुरुवारी घडली. राजू बाबूलाल राठौर (३५) असे मृताचे, तर प्रज्योत हरिकिशोर मालवीय (३०) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याला नजीकच्या चुरणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
काटकुंभ येथे शेत नांगरणीसाठी ट्रेक्टर घेऊन गेले असता एक शेतामधून दुसऱ्या शेतात ट्रॅक्टर नेताना ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरखाली आल्याने चालक राजू राठौर याचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत बसलेला प्रज्योत मालवीय गंभीर जखमी झाला. वेळप्रसंगी घटनास्थळावर दोन जेसीबीमशीनने ट्रेक्टर हटवून जखमी व मृताला स्थानिकांनी बाहेर काढले.
मृत राजू राठौरच्या शेतात कल्टिव्हेटर फिरविणयासाठी मालक प्रज्ज्योत हा ट्रेक्टर घेऊन गेला असता चिखल असलेल्या जागेवर ट्रॅक्टर पलटी झाला. मृताची शवविच्छेदनाची प्रक्रिया चुरणी ग्रामीण रुग्णालयात सुरू असून जखमी प्रज्योत याला पुढील उपचारकारित अमरावतीला हलविण्यात आले आहे.