शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वाजत-गाजत आले गणराया

By admin | Updated: September 6, 2016 00:07 IST

‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयजयकाराने सोमवारी शहर दुमदुमले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी अमरावतीकरांचे लक्ष वेधले होते.

मिरवणुकींनी दुमदुमले शहर : ५५२ मंडळांकडून प्रतिष्ठापनाअमरावती : ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयजयकाराने सोमवारी शहर दुमदुमले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी अमरावतीकरांचे लक्ष वेधले होते. घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. यंदा शहरात ५५२ गणेशांचे शानदार स्वागत करण्यात आले. यंदाही महिनाभरापूर्वी गणेश स्थापनेची उत्सुकता पाहायला मिळाली. शहरातील बाजारपेठाही सजल्या होत्या. सोमवारी गणेश स्थापनेचा दिवस उजाडताच भाविकांची लगबग सुरू झाली. घरोघरी बच्चे कंपनीपासून तर वयोवृध्द मंडळींमध्ये गणरायाच्या स्वागताची उत्सुकता लागली होती. गल्ली बोळातून ढोलताशांचा आवाज गुंजले, तर मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्यदिव्य मिरवणूक काढून अमरावतीकरांचे लक्ष वेधले. गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा, ढोलताशांचा गजर, आतषबाजीमध्ये गणेशाचे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)पोलिसांचा चोख बंदोबस्तशहरातील विविध सार्वजनिक मंडळांनी सोमवारी उत्साहात गणेश स्थापनेला सुरुवात केली. भव्यदिव्य मिरवणूक काढून गणेशाचे स्वागत केले. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामध्ये राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या, जालना व नागपूर येथील प्रशिक्षणार्थी, ३५० पुरुष होमगार्ड, ५० महिला होमगार्ड, तसेच नागपूर येथील पीटीएसमधून एक पोलीस निरीक्षक व दोन पीएसआय यांचा सहभाग होता. २५ ठिकाणी विक्री शहरात २५ ठिकाणी गणेश मुर्तींची विक्री करण्यास पोलीस परवानगी देण्यात आली. त्यामध्ये फे्रजरपुरा २, नांदगाव पेठ १, बडनेरा १२, राजापेठ ५, कोतवाली ३, खोलापुरी गेट ३, भातकुली ४, गाडगेनगर ४ व वलगाव १ या ठिकाणांचा सहभाग आहे. नेहरू मैदान, सायंस्कोर मैदान, राजापेठ या ठिकाणी गणेश खरेदीकरिता सर्वाधिक गर्दी झाली होती.