अमरावती - येथील कांता नगर परिसरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील गनेडी लेआउट येथे अज्ञातांनी 3 ट्रॅव्हल्सला आग लावली. ही घटना मंगळवारी रात्री साडे अकरा दरम्यान गाडगेनगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह अग्निशमन दलाच्या तीन वाहनांसह पथकप्रमुख सैयद अन्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक दाखल झाले असून, वृत्त लिहिस्तोवर आग नियंत्रणात आलेली नव्हती.
अमरावती येथे तीन ट्रॅव्हल्स अज्ञातांनी जाळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 00:04 IST