अमरावती - भरधाव चारचाकी वाहन झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शहरातील धारणी मार्गावरील अंबिका लॉन्स जवळ २ सप्टेबर रोजी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातीतील युवक बोरगाव मंजू येथील रहिवासी असल्याचे समजते. परतवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. एमएच ३० एटी १९२७ या चारचाकी वाहनाला हा अपघात झाला.
चारचाकी झाडावर धडकून भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 23:38 IST