शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Maharashtra Rain: पश्चिम विदर्भात अतिवृष्टीने तिघांचा मृत्यू, ९,९१४ हेक्टरमध्ये नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 8:21 PM

West Vidarbha rain Update: प्राथमिक अंदाज, दमदार पावसाने १९ तालुके बाधित, २,२९७ घरांचे नुकसान. विभागात गुरुवारी सरासरी ४२ मिमी व शुक्रवारी १७ मिमी पावसाची नोंद झाली. यात संपूर्ण अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.

अमरावती : पश्चिम विदर्भात ४८ तासात झालेल्या मुसळधार पावसाने १९ तालुके बाधित झाले. या आपत्तीत तिघांचा मृत्यू झाला, तर २,२९७ घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय ९,९१४ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. (Heavy Rain in Vidarbha; loss of crops.)

विभागात गुरुवारी सरासरी ४२ मिमी व शुक्रवारी १७ मिमी पावसाची नोंद झाली. यात संपूर्ण अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात दोन तालुके बाधित झाले. यामध्ये ४६ घरांची पडझड झाली, तर २६३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. वाशिम जिल्ह्यात सहा तालुके बाधित झाली, यामध्ये १४ घरांचे अंशत: नुकसान व २,६७१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे.

अकोला जिल्ह्यात पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. २,२३७ घरांचे नुकसान तर ६,२०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. बुलडाणा जिल्ह्यात नुकसान निरंक आहे. यवतमाळ जिल्ह्यात २१ जुलैला पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. यात ४० घरांची पडझड व ७८० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय २२ ला पावसामुळे चार घरांची पडझड झालेली आहे.बॉक्स

भिंत पडून एकाचा मृत्यूबुलडाणा जिल्ह्यात घराची भिंत अंगावर कोसळल्याने देऊळगावनगर येथील ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. याशिवाय भिंगारा बीटमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. सारा येथील एका शेतातील पोलमध्ये वीज प्रवाह संचारल्याने दोन बैल दगावले व सोनार गव्हाण येथे आग लागल्याने दोन गायी दगावल्या. अकोला जिल्ह्यात अकोट येथे ४५ वर्षीय व्यक्ती पठार नदीच्या पुरात वाहून गेला.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ