शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

आमदार रवी राणा यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिवसा न्यायालयाचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 8:00 PM

मोर्चादरम्यान शासकीय संपत्तीचे नुकसान केल्याचा ठपका ठेवून तिवसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही.एन. दीडवलकर  यांनी बडने-याचे अपक्ष आमदार रवि राणा यांना मंगळवारी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

तिवसा : मोर्चादरम्यान शासकीय संपत्तीचे नुकसान केल्याचा ठपका ठेवून तिवसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही.एन. दीडवलकर  यांनी बडने-याचे अपक्ष आमदार रवि राणा यांना मंगळवारी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राणा यांच्यासह एकूण २७ कार्यकर्त्यांनाही ही शिक्षा सुनावण्यात आली. सर्वांची रवानगी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. २०१२ साली राणा यांनी तिवसा येथे शेतक-यांसाठी आक्रमक आंदोलन पुकारले होते. मंगळवारी न्यायालयाने आमदार रवी राणा यांच्यासह उपस्थित सर्व ३४ जणांना प्रत्येकी ५०० रुपये दंड भरण्याचा पर्याय दिला; तथापि आम्ही दंंड भरून शासनाची तिजोरी का भरायची? द्यायचेच झाले तर रक्कम आम्ही मृत शेतक-यांच्या विधवांना देऊ, अशी भूमिका रवि राणा यांनी न्यायासनासमोर स्पष्ट केली. आपण न्यायाधीश आहात, मग मरणवाटेने जाणा-या शेतक-यांना न्याय द्या, अशी अपेक्षाही राणा यांनी न्यायासनासमोर व्यक्त केली. न्यायालयाच्या अपमानासंबंधिचा इशारा देऊन न्यायासनाने रवी राणा यांच्यासह एकूण २७ जणांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ते सर्व ९ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत असतील. सात जणांनी दंड भरल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली. मंगळवारी रवी राणा हजर होणार असल्याने सायंकाळी अमरावती येथील दंगा नियंत्रण पथक तसेच चांदूर रेल्वे व कु-हा ठाण्यातून अधिकची कुमूक दाखल झाल्याने तिवसा न्यायालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. 

काय आहे प्रकरण?२०१२ साली कापसाला योग्य हमीभाव मिळत नसल्याच्या मुद्यावरून आमदार रवी राणा यांनी तिवसा येथे अमरावती-नागपूर महामार्गवरील पेट्रोल पंप चौकात रस्तारोको आंदोलन छेडले होते. आंदोलनादरम्यान एसटीची तोडफोड करण्यात आली. तिवसा पोलिसांनी आमदार राणांसह ३९ शेतकरी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणात ३८ जणांनी जमीन मिळविला होता. आमदार रवी राणा यांनी जामीन नाकारला यामुळे त्यांना ९ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणात राणा हे मुख्य आरोपी असल्याने त्यांना वारंवार तिवसा न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलेत. मात्र ते हजर झाले नाहीत.  शेतक-यांसाठी आंदोलन केले होते. किडनी बाधित झाली होती.  शल्यक्रियाही झाली. तिवसा न्यायालयाने मंगळवारी प्रत्येकी पाचशे रुपये दंड ठोठावला. हा दंड आम्ही न्यायालयात भरणार नाही. शेतक-यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तो भरू, असा आग्रह धरला. न्यायालयाने कोठडी सुनावली. शेतक-यांसाठी हसत हसत सजा भोगण्यास तयार आहे. - रवी राणा,आमदार, बडनेरा.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाAmravatiअमरावतीCourtन्यायालय