माहुली प्रकरणात तिघांना अटकपूर्व जामीन

By Admin | Updated: September 20, 2015 00:43 IST2015-09-20T00:43:13+5:302015-09-20T00:43:13+5:30

माहुली (जहागीर) येथील उद्रेकात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेल्या तिघांचा न्यायालयाने शनिवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला....

Three arrests in anticipatory bail in Mahuli case | माहुली प्रकरणात तिघांना अटकपूर्व जामीन

माहुली प्रकरणात तिघांना अटकपूर्व जामीन

जाळपोळ प्रकरण : पोलीस जाणार उच्च न्यायालयात
अमरावती : माहुली (जहागीर) येथील उद्रेकात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेल्या तिघांचा न्यायालयाने शनिवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस उच्च न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल करणार आहे.
१५ आॅगस्ट रोजी माहुलीत साहिल डायरेचा बसखाली मृत्यू झाल्यानंतर उदे्रकाला सुरुवात झाली होती. त्यामध्ये पोलिसांनी ५०० गावकऱ्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केलते. घटनेच्या १४ दिवसांनंतर पोलिसांनी दोषी गावकऱ्यांना अटक करण्याची मोहीम सुरूकरुन आठ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये जाळपोळ व दरोडाच्या गुन्हामध्ये संरपंच संजय नागोने, प्रवीण मनोहरे व नरेंद्र खासबागे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. शुक्रवारी त्यांच्या जामिनवर न्यायालयात सुनावणी होती. विद्यमान न्यायाधीश एस.डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयात सरकारी पक्ष व खासगी अभियोक्ता अतुल चवरे यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने शनिवारी तिघांचाही जामीन मंजूर झाल्याचे आदेश दिले, असल्याचे चवरे यांनी सांगितले.
ठाणेदारांचा चौकशी अहवाल पूर्ण
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशाने दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यांची चौकशी उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे करीत आहेत. यासंदर्भात माहुलीचे ठाणेदार प्रकाश हिंगमिरे यांनाही चौकशी करून अहवाल मागविण्यात आला होता. त्यांची चौकशी पूर्ण झाली असून तो अहवाल पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणेदार हिंगमिरे यांनी दिली.

Web Title: Three arrests in anticipatory bail in Mahuli case